घरमुंबईमुंबईच्या काही भागात टोळ दिसू लागल्याने एकच खळबळ

मुंबईच्या काही भागात टोळ दिसू लागल्याने एकच खळबळ

Subscribe

विक्रोळी, ताडदेव, वरळी भागात मोठ्या संख्येने टोळ दिसून आल्यामुळे राज्याच्या इतर भागात धुमाकूळ घालणारी टोळधाड मुंबईत तर ढेरेदाखल होत नाही ना, असा प्रश्न निर्माण झाला आहे. करोना संसर्गाच्या संकटाने हैराण झालेल्या मुंबईकरांना आता या टोळधाडीचे संकट सतावू लागले आहे.

आफ्रिकेतून निघालेली टोळधाड येमेन, इराण, पाकिस्तानमार्गे भारतात पोहोचली. देशातल्या अनेक राज्यांमधील पिकांचे नुकसान करणारी ही टोळधाड आता मुंबईत दाखल झाली आहे. राज्यातल्या अमरावती, नागपूर, वर्ध्यात या टोळधाडीने शेतकर्‍यांचे काही प्रमाणात नुकसान केले आहे.

- Advertisement -

मुंबईतल्या विक्रोळी भागात मोठ्या संख्येनं टोळ पाहायला मिळाले. दक्षिण मुंबईतल्या ताडदेव, वरळीतही टोळ पाहायला मिळाले. तर गोरेगावमध्ये तुरळक संख्येनं टोळ दिसले. त्याआधी विदर्भातल्या अमरावती, वर्धा आणि नागपूरमध्ये टोळधाडीनं शेतकर्‍यांचं नुकसान झालं. नागपूरच्या काटोल, अमरावतीच्या मोर्शी, वरूडमध्ये टोळांची संख्या खूप जास्त होती. या टोळांनी तीन दिवसांत १२० किलोमीटर अंतर कापत विदर्भात शिरकाव केला.

सोमवारी (२५ मे) सकाळी नागपूरच्या काटोलमध्ये सर्वप्रथम टोळ पाहायला मिळाले. मात्र यामध्ये पिकांचं फार मोठं नुकसान झालं. मान्सून अद्याप दाखल न झाल्यानं अनेक भागांमध्ये पेरण्यादेखील सुरू झालेल्या नाहीत, अशी माहिती कृषी विभागाच्या नागपूर विभागाचे सहसंचालक रविंद्र भोसले यांनी दिली. महाराष्ट्रात येण्यापूर्वी टोळधाडीनं मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेशात शेतकर्‍यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केले.

- Advertisement -

मुंबईला धोका नाही
सोशल नेटवर्किंगवर मुंबईत टोळ दिसू लागल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र केंद्रीय कृषी मंत्रालयाअंतर्गत येणार्‍या टोळधाडी संदर्भात माहिती देणार्‍या द लोकस्ट वॉर्निंग ऑर्गनायझेशनने (एलडब्लूओ) मुंबईला टोळधाडीचा धोका नसल्याचे म्हटले आहे. तर दुसरीकडे राज्याचे कृषी आयुक्त सुहास दिवस यांनी मुंबईकरांसाठी टोळधाडीसंदर्भात कोणताही इशारा देण्यात आलेला नसल्याचे स्पष्ट केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -