घरमुंबईLok Sabha 2024 : वेड लागले नानाला, काय द्यावे वंचितला? कवितेतून भाजपाची...

Lok Sabha 2024 : वेड लागले नानाला, काय द्यावे वंचितला? कवितेतून भाजपाची मविआवर टीका

Subscribe

Lok Sabha 2024 : महायुती आणि मविआ या दोघांमध्ये जागावाटप झाले असले तरी काही जागांवरून कुरबूर सुरूच आहे. प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी आणि मविआ विशेषतः कॉंग्रेसचे सूर जुळले नाहीत. त्यामुळे वंचित मविआमध्ये सहभागी झाली नाहीच तर त्यांनी अनेक जागांसाठी उमेदवार दिले. मविआच्या या परिस्थितीवरच मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलार यांनी कवितेतून टीका केली आहे.

मुंबई : लोकसभा निवडणूक जाहीर झाली आणि सगळ्याच पक्षांची उमेदवारी जाहीर करण्याची धावपळ सुरू झाली आहे. महायुती आणि मविआ या दोघांमध्ये जागावाटप झाले असले तरी काही जागांवरून कुरबूर सुरूच आहे. त्यातच प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी आणि मविआ विशेषतः कॉंग्रेसचे सूर जुळले नाहीत. त्यामुळे वंचित मविआमध्ये सहभागी झाली नाहीच उलट त्यांनी अनेक जागांसाठी स्वतंत्र उमेदवार दिले. मविआच्या या परिस्थितीवरच मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलार यांनी कवितेतून टीका केली आहे. (Lok Sabha 2024 Ashish Shelar slams MVA congress through poem on seat sharing for loksabha elections)

महाविकास आघाडीत काही जागांवरून तिढा आहे. आघाडीत सहभागी होण्याची वंचित बहुजन आघाडीची इच्छा होती. मात्र, कॉंग्रेस आणि वंचितचे सूर काही जुळले नाहीत. सुरुवातीच्या चर्चेच्या दिवसांमध्ये आंबेडकर हे सातत्याने कॉंग्रेसवर टीका करत होते. कॉंग्रेसच्या पक्षश्रेष्ठींकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्याची खंत आंबेडकर यांनी व्यक्त केली होती. तर नाना पटोले यांनी देखील वंचितवर टीका केली. परंतु, मविआ वंचितबाबत निर्णय घेऊ शकली नाही. यावरून भारतीय जनता पक्षाने मविआवर टीका केली आहे. मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलार यांनी जागावाटप आणि वंचितच्या मुद्द्यावरून मविआला कवितेतून टोला लगावला आहे. प्रसिद्ध कवी भा.रा. तांबे यांच्या ‘तुझ्या गळा, माझ्या गळा…’ या कवितेचं विडंबन करत शेलारांनी मविआवर टीका केली आहे. शेलार यांनी ही कविता एक्स (पूर्वीचे ट्विटर) या प्लॅटफॉर्मवरदेखील शेअर केली आहे. (lok sabha 2024 Ashish Shelar slams MVA congress through poem on seat sharing for loksabha elections)

- Advertisement -

या निवडणुकीत जास्तीतजास्त जागा आपल्याला मिळाव्यात यासाठी युती आणि आघाडीमध्ये स्पर्धा सुरू आहे. महायुतीत नाशिक, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातील काही जागांवर संघर्ष सुरू आहे. तर महाविकास आघाडीत सांगली, भिवंडी, परभणीच्या जागेवरून तिढा निर्माण झाला आहे. तसेच वंचित बहुजन आघाडीबाबत महाविकास आघाडी वेळीच कोणताही निर्णय घेऊ शकली नाही. त्यामुळे वंचितने स्वतंत्र चूल मांडत आपले उमेदवारही जाहीर केले. (Lok Sabha 2024 Ashish Shelar slams MVA congress through poem on seat sharing for loksabha elections)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -