घरमुंबईSanjay Raut : दिल्ली अभी बहोत दूर है बच्चू; संजय राऊतांनी श्रीकांत...

Sanjay Raut : दिल्ली अभी बहोत दूर है बच्चू; संजय राऊतांनी श्रीकांत शिंदेंवर साधला निशाणा

Subscribe

मुंबई : विकास कामाच्या जोरावर महायुतीचा उमेदवारी कल्याण-डोबिंवली मतदार संघात मोठ्या मताधिक्क्याने जिंकेल असे वक्तव्य शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी केले होते. त्यांच्या वक्तव्यावर निशाणा साधताना दिल्ली अभी बहोत दूर है बच्चू असा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. (Lok Sabha Election 2024 Delhi is still far away Bachchu Sanjay Raut targets Shrikant Shinde)

हेही वाचा – Politics : …शिवाजी महाराजांनी दृष्टांत दिला; बारामतीचा पेच पुन्हा वाढला?

- Advertisement -

विकास कामाच्या जोरावर महायुतीचा उमेदवारी कल्याण-डोबिंवली मतदार संघात मोठ्या मताधिक्क्याने जिंकेल असे वक्तव्य शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी केले असल्याचा प्रश्न संजय राऊत यांना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, आधी तुमची उमेदवारी जाहीर करा म्हणावं. कल्याण-डोंबिवलीमध्ये आपण विद्यमान खासदार आहात. जी खासदारकी तुम्हाला उद्धव ठाकरे यांच्यामुळे मिळाली. पण या तुमच्या नव्या युतीमध्ये तुम्ही तुमची उमेदवारी जाहीर करू शकत नाहीत आणि जिंकण्याची भाषा अब दिल्ली बहोत दूर है बच्चू, असा उल्लेख संजय राऊत यांनी केला. त्यांनी म्हटले की, तुम्ही दिल्लीत आता पोहचणार नाही, असा इशाराही दिला.

हेही वाचा – Lok Sabha : ठाकरेंचा प्रस्ताव फेटाळत राजू शेट्टींकडून ‘एकला चलो रे’चा नारा; कारणंही स्पष्ट केलं

- Advertisement -

संजय राऊत म्हणाले की, एक आमची सामान्य कार्यकर्ती वैषाली दरेकर तिथे अहंकार आणि गद्दारीचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही. हा निर्णय लोकांचा आहे. कल्याण-डोंबिवली मतदारसंघात गद्दारी, अहंकार आणि पैशांची मस्ती, गुंडगिरी याचा पराभव वैषाली दरेकर ही सामान्य शिवसैनिक, सामान्य गृहिणी 100 टक्के करणार आहे. कितीही बलदंड व्यक्ती असो, मस्ती चालणार नाही. आम्ही तुमचा पराभव करू, सामान्य मतदार तुमचा पराभव करेल, हे लोकांनी ठरवलं आहे. आम्ही नारायण राणेंचा पराभव केला आहे. इंदिरा गांधी यांचा पराभव राज नारायण यांनी केला होता. अनेक मोठे लोकं महाराष्ट्रात पडले आहेत. त्यामुळे जो बच्चा त्यांनी स्वत:ची उमेदवारी जाहीर करावी हिंमत असेल तर. महाराष्ट्रात सर्वत्र उमेदवारी जाहीर झाल्या आहेत. फक्त तुमची आणि ठाण्याची उमेदवारी राहिली आहे, असं संजय राऊत म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -