घरमुंबईLok Sabha : ठाकरेंचा प्रस्ताव फेटाळत राजू शेट्टींकडून ‘एकला चलो रे’चा नारा;...

Lok Sabha : ठाकरेंचा प्रस्ताव फेटाळत राजू शेट्टींकडून ‘एकला चलो रे’चा नारा; कारणंही स्पष्ट केलं

Subscribe

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि राज्यातील शेतकऱ्यांचे नेते राजू शेट्टी यांचा पक्ष महाविकास आघाडीत सहभागी होतील आणि मविआच्या पाठिंब्यावर ते निवडणूक लढवतील अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून ऐकायला मिळत होती. याशिवाय राजू शेट्टी यांच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत सातत्याने भेटीगाठी होत होत्या. विशेष म्हणजे ठाकरे गटाने राजू शेट्टी यांना ठाकरे गटाच्या मशाल चिन्हावर हातकणंगलेमधून लोकसभा निवडणूक लढण्याचा प्रस्ताव देखील दिला होता. मात्र आता राजू शेट्टी यांनी ठाकरे गटाचा प्रस्ताव फेटाळत हातकणंगलेमधून स्वतंत्रपणे लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंदर्भात त्यांनी कारणही स्पष्ट केलं आहे.

मुंबई : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि राज्यातील शेतकऱ्यांचे नेते राजू शेट्टी यांचा पक्ष महाविकास आघाडीत सहभागी होतील आणि मविआच्या पाठिंब्यावर ते निवडणूक लढवतील अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून ऐकायला मिळत होती. याशिवाय राजू शेट्टी यांच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत सातत्याने भेटीगाठी होत होत्या. विशेष म्हणजे ठाकरे गटाने राजू शेट्टी यांना ठाकरे गटाच्या मशाल चिन्हावर हातकणंगलेमधून लोकसभा निवडणूक लढण्याचा प्रस्ताव देखील दिला होता. मात्र आता राजू शेट्टी यांनी ठाकरे गटाचा प्रस्ताव फेटाळत हातकणंगलेमधून स्वतंत्रपणे लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंदर्भात त्यांनी कारणही स्पष्ट केलं आहे. (Lok Sabha election 2024 Rejecting Thackerays proposal Raju Shettys Ekla Chalo Re slogan Hatkanangle Constituency mashal sign)

हेही वाचा – Sanjay Nirupam : काँग्रेस नेते संजय निरूपम यांची सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी

- Advertisement -

लोकसभा निवडणुकीसंदर्भात भूमिका स्पष्ट करताना राजू शेट्टी म्हणाले की, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीच्या काही बैठकांमध्ये आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आम्ही गेल्या तीन वर्षांपासून लोकसभा निवडणुकीची स्वतंत्र तयारी केली होती. परंतु, मधल्या काळात आमच्या काही सदस्यांनी भाजपाविरोधातील मतांची विभागणी टाळण्यासाठी आपण महाविकास आघाडीचा पाठिंबा घ्यावा असा विचार मांडला होता. याशिवाय महाविकास आघाडीचे नेते सातत्याने सांगत होते की, ते हातकणंगले लोकसभा मतदारसंघात उमेदवार देणार नाहीत. ही जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडणार आहे.

राजू शेट्टी म्हणाले की, मी सुद्धा दोन वेळा उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना सांगितलं होतं की, मविआने हातकंणगलेत उमेदवार देऊ नये, जेणेकरून भाजपाच्या विरोधातील मतांची विभागणी होणार नाही. आमच्यात सविस्तर चर्चाही झाली. माझे काही मुद्दे त्यांना पटले, त्यांनी त्यासंदर्भात लवकरच निर्णय घेऊ असं आम्हाला सांगितलं होतं. मात्र काही दिवसांपूर्वी मला ठाकरे गटाकडून निरोप आला की, आम्ही मशाल चिन्हावर निवडणूक लढली पाहिजे. परंतु, मशाल हे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचं चिन्ह आहे. ते चिन्ह घेणं म्हणजे मी शिवसेनेत अधिकृतपणे प्रवेश केलाय असा त्याचा अर्थ होतो, असं राजू शेट्टी म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – Rajiv Gandhi : राजीव गांधी हत्येतील तीनही आरोपी श्रीलंकेत परतले; दोन वर्षांपूर्वीच झाली सुटका

मी गेली 30 वर्षे शेतकरी चळवळीत काम करत आहे आणि आयुष्यात कोणत्याही राजकीय पक्षात कधी काम केलेलं नाही, असं स्पष्ट करत राजू शेट्टी म्हणाले की, निवडणूक लढवता यावी म्हणून आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेची स्थापना केली. या पक्षाच्या माध्यमातून अनेकदा निवडणुका लढवल्या. परंतु, आता व्यक्तीगत अथवा राजकीय फायद्यासाठी मी शेतकऱ्यांना आणि संघटनेला वाऱ्यावर सोडून निवडणूक लढवू शकत नाही. त्यामुळे मी मशाल या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवणार नाही, असं ठाकरे गटाला कळवलं आहे. याशिवाय हातकणंगलेत उमेदवार जाहीर केला आहे. त्यामुळे आता तो त्यांचा निर्णय घेईल. परंतु आम्ही आधीच स्वतंत्र निवडणूक लढवण्याची भूमिका घेतली आहे, असं राजू शेट्टी यांनी स्पष्ट केलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -