Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी अनिल परब यांचे वांद्य्रातील कार्यालय तोडण्याचे आदेश, सोमय्या यांचा दावा

अनिल परब यांचे वांद्य्रातील कार्यालय तोडण्याचे आदेश, सोमय्या यांचा दावा

Related Story

- Advertisement -

राज्याचे परिवहन मंत्री अ‍ॅड. अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यांच्या वांद्रे पूर्व येथील कार्यालयावर तोडक कारवाई करण्याचे आदेश लोकायुक्तांनी दिलेत, अशी माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली. 2 ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या दिवशी अनिल परब यांच्या ऑफिसवर ही कारवाई होणार असल्याचा दावा किरीट सोमय्यांनी केला आहे.

राज्यातील आघाडी सरकारमधील परिवहन मंत्री आणि उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे अनिल परब यांचेअनधिकृत रिसॉर्ट तोडल्यानंतर आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी त्यांचा मोर्चा अनिल परब यांच्या वांद्रे येथील ऑफिसकडे वळवला आहे. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन 2 ऑक्टोबरला म्हाडाकडून कारवाई होणार असल्याचा दावा केला आहे.

- Advertisement -

परिवहन मंत्री अनिल परब यांनी अनधिकृत बांधकाम केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी 2019 मध्ये केला होता. त्यानुसार त्यांनी लोकायुक्तांकडे तक्रार केली होती. परब यांनी वांद्रे पूर्वेकडील गांधीनगर येथील इमारत क्रमांक 57 आणि 58 मधील मोकळ्या जागा बळकावून अनधिकृत बांधकाम केले असल्याची तक्रार सोमय्या यांनी केली होती. याप्रकरणी चौकशी करून अनधिकृत बांधकाम तोडून संबंधित जागा नागरिकांना वापरण्यासाठी उपलब्ध करून द्यावी, अशी विनंती त्यांनी याचिकेद्वारे केली. या याचिकेवर नुकतीच सुनावणी झाली आणि त्याचा रिपोर्टही किरीट सोमय्या यांनी प्रसारमाध्यमांना दिला आहे. या सुनावणीमध्ये लोकायुक्तांनी अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

- Advertisement -