घरमुंबईगृहराज्यमंत्र्यांच्या नावाचा वापर करून साडेनऊ लाखांचा गंडा

गृहराज्यमंत्र्यांच्या नावाचा वापर करून साडेनऊ लाखांचा गंडा

Subscribe

गृहराज्यमंत्री रणजितसिंह पाटील यांच्याशी ओळख असल्याचे सांगून बिल्डरला शस्त्रपरवाना मिळवून देतो असे आमिष दाखवून साडेनऊ लाख रुपयांना लुबाडले असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे . या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी आरोपी अतुल पेठे याला अटक केले आहे. अतुलच्या विरुद्ध यापूर्वी विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

अंबरनाथ येथे राहणार्‍या उमेश पवार यांचे अंबरनाथ (पूर्व ) येथील आनंदनगर एमआयडीसी येथे मटेरियल सप्लाय चे दुकान आहे. पवार यांना खंडणीसाठी वारंवार गुंडांकडून फोन येत असल्याने त्यांनी अग्नीशस्त्र परवाना मिळावा म्हणून नोव्हेंबर 2016 ला गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांच्या कार्यलयात अर्ज दाखल केला होता. त्यावेळी पवार यांच्या नातेवाईकांनी अतुलचे नाव सुचवले, तो एयर इंडिया मध्ये कार्यरत असल्याचे सांगून तुझे बंदुक परवान्याचे काम करून देईल असे सांगितले होते.

- Advertisement -

त्यानंतर पवार यांनी अतुल याच्याशी संपर्क साधला त्यावेळी त्यांना अतुलने मंत्रालयात पवार यांना बोलावले. तेथे तुमच्या बंदूक परवान्याच्या कामासाठी 12 ते 14 लाख रुपये लागतील. मात्र गृहराज्यमंत्री माझ्या परिचयाचे असल्याने तुमचे काम 6 लाखांपर्यंत करून देण्याचे आमिष पवारला दाखवले.

अतुलला मंत्रालयात नोव्हेंबर 2016 मध्ये पवारने 6 लाख रुपये दिले. त्यानंतर काही दिवसांनी पवार यांनी अतुलशी संपर्क करून बंदुक परवान्याच्या कामाबद्दल विचारणा केली असता आणखी तुम्हाला 3 लाख रुपये द्यावे लागतील असे सांगून त्यांच्याकडून 28 नोव्हेंबर 2017 रोजी 3 लाख रुपये घेतले आणि नंतर पुन्हा 50 हजार रुपयांची मागणी केली. अशा प्रकारे तब्बल साडेनऊ लाख रुपये पवार यांनी त्याला दिले होते.

- Advertisement -

दरम्यान, पवार यांनी गृहराज्यमंत्री यांच्या कार्यलयात जावून बंदुक परवाना बाबत दिलेल्या अर्जावर काय कार्यवाही झाली. याबाबत विचारणा असता तुमचा अर्ज नामंजूर करण्यात आल्याचे समजल्यावर फसवणुकीचा प्रकार उघड झाला. या प्रकरणी पोलिसांनी अतुलला बेड्या ठोकल्या असून त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने अधिक पोलीस कोठडी सुनावली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -