घरमुंबईहजेरीपटावरील अनुपस्थित विद्यार्थ्यांना दिलासा! परीक्षा देण्याची मुभा

हजेरीपटावरील अनुपस्थित विद्यार्थ्यांना दिलासा! परीक्षा देण्याची मुभा

Subscribe

हजेरीपटावरील उपस्थिती कमी असल्यामुळे वर्ष वाया जाणाऱ्या ४०० हून अधिक विद्यार्थांना मुंबई विद्यापीठाने दिलासा दिला आहे. मुंबईतील एन. एम. महाविद्यालय, के. ई. एस, विल्सन आणि मिठीबाई कॉलेज मधील बी. कॉम, बी. ए. च्या पहिल्या आणि दुसऱ्या वर्षातील ४०० हून अधिक विद्यार्थ्यांची चालू वर्षातील हजेरी ५० टक्क्यांहून कमी असल्यामुळे नियमानुसार त्यांना परिक्षेला बसता येणार नव्हते. याविरोधात युवा सेना आणि संबंधित कॉलेजच्या प्रशासनाने मुंबई विद्यापीठाकडे पाठपुरावा केला होता. अखेर आज विद्यापीठातर्फे परिपत्रक काढून हजेरी पूर्ण नसलेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या दूरस्थ व मुक्त शिक्षण संस्थेतर्फे (IDOL) परीक्षा देण्याची सोय करण्यात आलेली आहे. यासाठी संबंधित विद्यार्थ्यांना १० मे रोजी कलिना येथील आयडॉल केंद्रावर जाऊन अर्ज करायचा आहे.

मिठीबाई कॉलेजचे प्राचार्य डॉ. राजपाल हांडे यांनी या निर्णयाचे स्वागत केले. या निर्णयामुळे अनेक विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाण्यापासून वाचणार असल्याचे ते म्हणाले. युवा सेनेतर्फे तीव्र निषेध नोंदविण्यात आल्यानंतर वर्ष वाया जाऊ नये, यासाठी परीक्षा परत घेण्याचा पुन्हा विचार करावा अशी मागणी करण्यात आली होती. यासंदर्भात शनिवारी पार पडलेल्या अकॅडेमिक कौन्सिल मीटिंगमध्ये हा प्रश्न मांडला गेला. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून, जे विद्यार्थी या परीक्षेला मुकले आहे त्यांना आता आयडॉलमधून परीक्षा देता येणार आहे, अशा स्वरुपाचा निर्णय मुंबई विद्यापिठातर्फे घेण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -