घरमुंबईलोअर परळ येथील पुलाच्या कामासाठी ११ तासांचा मेगाब्लॉक

लोअर परळ येथील पुलाच्या कामासाठी ११ तासांचा मेगाब्लॉक

Subscribe

लोअर परळ रेल्वे स्थानकाजवळील डिलाईल पूलच्या कामासाठी पश्चिम रेल्वेने ११ तासांचा मेगाब्लॉक ठरवला आहे.

लोअर परळ येथील उड्डाणपुलाच्या कामासाठी वीकेण्डच्या दिवशी ११ तासांता मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे यादिवशी लोअर परळ ते चर्चगेट दरम्यानच्या २०० फेऱ्या होणार आहेत. या दिवशी लोअर परळ स्थानकाजवळील उड्डाणपूलाचे गर्डर काढण्यात येईल आणि त्याजागेवर नवे टाकण्यात येईल. यासोबतच या पुलाशी संबंधित इतर कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावर हा मेगाब्लॉक ठेवण्यात आला आहे.

प्रभादेवीला सगळ्या गाड्यांचा शेवटचा थांबा

हा मेगाब्लॉक २ फेब्रुवारीला रात्री १० वाजल्यापासून ते ३ फेब्रुवारीला सकाळी ९ वाजेपर्यंत असणार आहे, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे. या मेगाब्लॉक दरम्यान लोअर परळ स्थानकाजवळील ९० वाय ५३ मीटरचा डिलाईल पूलाचे गर्डर काढून त्याठीकाणे नवे टाकण्यात येणार आहे. या कामासाठी ४० टन वजनी दोन क्रेन कार्यरत असणार आहेत. मेगाब्लॉक दरम्यान लोअर परळ ते चर्चगेट एकही गाडी धावणार नाही. वसई, विरार, भाईंदर, बोरीवली येथून सुटणाऱ्या गाड्या प्रभादेवी स्थानकापर्यंत चालविण्यात येतील. त्यापुढे लोकलसेवा उपलब्ध नसेल. या मेगाब्लॉक दरम्यान इतर मेल गाड्याही लोअर परळ ते चर्चगेट थांबणार नाही. त्यामुळे त्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. तर काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

प्रवाशांचे हाल

या मेगाब्लॉक दरम्यान प्रवाशांना हाल सोसावे लागणार आहेत. याशिवाय, ज्या लोकांना महालक्ष्मी, मुंबई सेंट्रल किंवा चर्चगेटला जायचे आहे. त्यांना प्रभादेवी येथून बस, टॅक्सीने जावे लागणार आहे. त्यामुळे प्रवाशांना दररोजपेक्षा जास्त पैसे मोजावे लागतीत.


हेही वाचा – लोअर परळ पुलावरुन ‘सेना- मनसे’चा राडा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -