Eco friendly bappa Competition
घर मुंबई LPG Cylinder Price : व्यावसायिक सिलिंडर 83.5 रुपयांनी स्वस्त

LPG Cylinder Price : व्यावसायिक सिलिंडर 83.5 रुपयांनी स्वस्त

Subscribe

मुंबई : तेल कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात (LPG Cylinder Price) आज (1 जून) पुन्हा मोठी घट केली आहे. तेल कंपन्यांनी दर कमी केल्यामुळे आजपासून व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत कपात झाली असून घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरचे दर (Domestic LPG Gas Cylinder Rates) मात्र पूर्वीप्रमाणेच आहेत.

नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी (1 एप्रिल 2023) पेट्रोलियम कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलेंडरचे दर 91 रुपये 50 पैशांनी कमी केले होते. 1 मे 2023 रोजीही व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत 172 रुपयांनी कपात करण्यात आली होती. त्यानंतर सलग तिसऱ्या महिन्यात व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर कमी करताना मुंबईत 83.50 रुपये केले आहेत. त्यामुळे आता 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरसाठी मुंबईकरांना 1773 रुपये मोजावे लागणार आहेत.

- Advertisement -

देशातील विविध शहरात या किमतीत मिळणार गॅस सिलिंडर
1 जूनपासून 83.50 दर कमी झाल्यामुळे नवी दिल्लीत व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडर 1856.50 रुपयांवरून कमी होऊन 1773 रुपयांनी, तर कोलकातामध्ये 1960.50 रुपयांवरून 1875.50 रुपयांना विकला जाणार आहे. तर चेन्नईमध्ये एलपीजी गॅस सिलिंडर 84.50 रुपयांनी स्वस्त झाल्यामुळे 2021.50 रुपयांवरून घसरून 1937 रुपयांवर पोहोचला आहे.

घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कपात नाही
व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत घट झाली असली तरी गेल्या काही महिन्यांपासून घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. मार्च 2023 रोजी घरगुती सिलिंडरच्या किमतीत बदल करण्यात आला होता. त्यामुळे आज घरगुती एलपीजी गॅस सिलिंडर मुंबईमध्ये 1102.5 रुपये, दिल्लीमध्ये 1103 रुपये, लेहमध्ये 1340, भोपाळमध्ये 1108.5, जयपूरमध्ये 1106.5, बंगळुरूमध्ये 1105.5 रुपये आणि श्रीनगरमध्ये 1219 रुपयांना मिळत आहे.

- Advertisement -

विमान प्रवास स्वत: होण्याची शक्यता
व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतींमध्ये घट करताना तेल कंपन्यांनी जेट इंधनाच्या (air fuel) किमतीतही 1 जूनपासून नवे दर लागू केले आहेत. त्यामुळे जेट इंधनाच्या किंमतीत सुमारे 6,600 रुपयांची घट झाली असल्यामुळे आगामी काळात विमान प्रवास स्वत: होण्याची शक्यात आहे.

तेलाची किंमत कशी ठरवली जाते?
सरकारी तेल कंपन्या देशातील एलपीजीचे दर प्रत्येक महिन्याला ठरवतात. कच्च्या इंधनाच्या जागतिक दरांच्या आधारावर तेलाच्या किमती ठरवल्या जातात. त्यामुळे दर महिन्याला तेलाच्या किमती बदलल्या जातात. कच्च्या तेलाच्या किमतीचा थेट परिणाम एलपीजीच्या किमतीवर होतो. याशिवाय FOB, वाहतूक, विमा, कस्टम ड्युटी आणि पोर्ट ड्युटी इत्यादी कारणांमुळे एलपीजीच्या किमतीही बदलतात. त्यामुळे https://Iocl.Com/Products/Indanegas.Aspx वर क्लिक करून नवीन व्यावसायिक एलपीजी दर पाहू शकतात.

- Advertisment -