घरदेश-विदेशमोठी बातमी! लेफ्टनंट जनरल (निवृत्त) अनिल चौहान भारताचे नवे सीडीएस

मोठी बातमी! लेफ्टनंट जनरल (निवृत्त) अनिल चौहान भारताचे नवे सीडीएस

Subscribe

नवी दिल्ली : लेफ्टनंट जनरल (निवृत्त) अनिल चौहान यांची नवे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भारताचे पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्या निधनानंतर हे पद रिक्त होते. केंद्र सरकारने बुधवारी हा महत्त्वाचा निर्णय घेतला. ते भारत सरकारच्या लष्करी व्यवहार विभागाचे सचिव म्हणूनही काम करतील.

देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत यांचा 8 डिसेंबर 2021 रोजी हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला होता. Mi17V5 या हेलिकॉप्टरने सुलूर या एअर बेसवरून सकाळी 11.48 वाजता उड्डाण घेतले. ते वेलिंगटन येथे दुपारी 12.15 पोहचणार होते. 12.08 मिनिटांनी हेलिकॉप्टरचा संपर्क तुटला. कुन्नूरच्या जंगलात हे हेलिकॉप्टर कोसळले. हेलिकॉप्टरमध्ये सीडीएस जनरल बिपिन रावत व त्यांच्या पत्नीसह एकूण 14 लोक होते. या दुर्घटनेत सर्वांचा मृत्यू झाला होता. बिपीन रावत यांच्या पश्चात सीडीएसपद रिक्तच होते. त्यानंतर आता लेफ्टनंट जनरल (निवृत्त) अनिल चौहान यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

- Advertisement -

18 मे 1961 रोजी जन्मलेल्या लेफ्टनंट जनरल (निवृत्त) अनिल चौहान पुण्यातील राष्ट्रीय संक्षण अकादमीमध्ये प्रशिक्षण घेतले आणि 1981मध्ये 11व्या गोरखा रायफल्समधून ते भारतीय लष्कराच्या सेवेत दाखल झाले. डेहराडूनच्या इंडियन मिलिटरी अकादमीचे देखील ते माजी विद्यार्थी आहेत. आपल्या 40 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक प्रमुखपदांवर काम केले आहे. पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील बालकोट हवाई हल्ल्याच्या नियोजनातही त्यांचा सहभाग होता.

- Advertisement -

जम्मू-काश्मीर तसेच ईशान्य भारतातील प्रमुख दहशतवादविरोधी मोहिमांचाही त्यांना व्यापक अनुभव आहे. मेजर जनरलपदावर असताना बारामुला सेक्टरमधील नॉर्दन कमांडमध्ये त्यांनी काम केले आहे. तर, लेफ्टनंट जनरल म्हणून काम करत असताना ईशान्य भारतातील लष्कराची जबाबदारी होती. मे 2021मध्ये ते सैन्य दलातून निवृत्त झाले. अनिल चौहान यांना परम विशिष्ट सेवा पदक, उत्तम युद्ध सेवा पदक, अतिविशिष्ट सेवा पदक, सेना पदक आणि विशिष्ट सेवापदक देऊन गौरवण्यात आले आहे.

हेही वाचा – अखेर मुहूर्त ठरला; चांदणी चौकातील पूल पाडणार, वाहतूक 9 तास राहणार बंद

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -