घरमुंबईएलएनटीव्दारे कोस्टल रोडच्या कामाचा लवकरच श्रीगणेशा

एलएनटीव्दारे कोस्टल रोडच्या कामाचा लवकरच श्रीगणेशा

Subscribe

मुंबईतील कोस्टल रोडच्या निवीदा नुकत्याच काढण्यात आल्या आहेत. या निविदांना चांगला प्रतिसाद मिळाला. या निविदा प्रक्रियेत लार्सन अँड टुब्रो (एलअँडटी) कंपनीने भाग घेतला असून पहिल्या टप्प्यातील काम त्यांना देण्यात आले. निविदेतील अटी व शर्थीबाबत अद्याप महानगरपालिका अधिकाऱ्यांनी गुप्तता पाळली असली तरी येत्या दहा ते पंधरा दिवसात याबाबत माहिती खुली केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

– १५ मे रोजी केला होता करार
पालिकेचे प्रभारी अधिकारी संजय मुखर्जी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पालिकेने पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण करण्यासाठी ठेकेदारासोबत १५ मे रोजी करार केला होता. या पावसाळ्यात कोस्टल रोडचे काम सुरु करण्यात येणार असून पुढील चार वर्षांमध्ये हे काम पूर्ण होणार आहे. येत्या दहा ते पंधरा दिवसात या प्रकल्पाला लागणाऱ्या खर्चाबाबत माहिती प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

- Advertisement -

– कोस्टल रोडचे तीन टप्पामध्ये विभाजन
प्रिन्सेस स्ट्रीट पूलापासून ते वांद्रे वरळी सी लिंक पर्यंतचा ९.९८ किमी. कोस्टल रोडचे काम पालिकेने तीन टप्प्यात विभागले आहे. या कामात ३.४ किमीचा बोगद्याच्या कामाचा समावेश आहे. प्रत्येक टप्प्यासाठी पालिकेने वेगळ्या निविदा काढल्या आहेत. मुंबईच्या पश्चिम किनारपट्टीवरील हा सर्वात मोठा कोस्टल रोड आहे. मागील वर्षी कोस्टल रोडला केंद्र आणि राज्य सरकारने हिरवा कंदिल दाखवल्या नंतर या कामाला पालिकेने दोन टप्प्यांमध्ये विभागले होते. प्रिंसेस स्ट्रीट फ्लायओव्हर ते वांद्र वरळी सी लिंक हा पहिला टप्पा तर वांद्रे ते कांदिवली हा दूसरा टप्पा ठरवण्यात आला होता. मात्र डिसेंबर दरम्यान वांद्रे ते वर्सोवा या परिसरातही कोस्टल रोड उभारण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आल्यानंतर या प्रकल्पाला तीन टप्प्यात विभागण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -