LTT येथून २५ लाखांचं चरस जप्त; तस्करी करणाऱ्या दोघांना अटक

२५ लाखांचा चरस जप्त, एनसीबी आणि रेल्वेची संयुक्त कारवाई

चरस या अमली पदार्थाची तस्करी करणार्‍या अल्ताफ अली हिशामुद्दीन शेख आणि साबिर अली अजहर सैय्यद (रा. कुर्ला) या दोन तस्करांना नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो आणि आरपीएफ पोलिसांनी शनिवारी रात्री अटक केली आहे. त्यांच्याकडून २५ लाख रुपयांचा साडे सहा किलो चरस जप्त केले आहे. नवीन वर्षांच्या स्वागताच्या जल्लोषाची तयारी सुरु झाली असून मुंबईत शहरात अमलीपदार्थ आणर्‍यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो विभागाने आता अशा अमलीपदार्थांच्या तस्करांना आळा घालण्यासाठी सर्वत्र चौकशी सुरु केली आहे.

शनिवारी लोकमान्य टिळक टर्मिनलसवर आलेल्या हरिद्वार लोकमान्य टिळक एक्स्प्रेस रात्री 10 वाजून 36 मिनिटांनी प्लॅटफॉर्म क्रंमाक 2 वर आली होती. यादरम्यान एनसीबी (नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो) आणि रेल्वे सुरक्षा बलाच्या संयुक्तरित्या पथकाने या गाडीतील प्रवाशांची चौकशी सुरु केली. यादरम्यान कोच क्रंमाक बी-9 मध्ये दोन संशयास्पद प्रवासी आढळून आले.त्यांच्याबरोबर चार महिला आणि दोन मुलेही होती. तेव्हा आरपीएफ आणि एनसीबीच्या अधिकार्‍यांना त्यांची चौकशी केली. यावेळी त्यांच्याकडे 6 किलो 626 ग्रॅम चरस आढळले. दरम्यान, आरपीएफ पोलिसांनी या दोन्ही आरोपींना अटक केली. जप्त केलेल्या चरसची किंमत 25 लाख रुपये असल्याची माहिती आरपीएफ पोलिसांनी दिली. तसेच जप्त केलेल्या चरस आणि आरोपीना नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढची चौकशी एनसीबीकडून करण्यात येत आहे.

लोकमान्य टिळक टर्मिनसचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक राणा यांंनी सांगितले की, हे दोन्ही आरोपी कुर्ला येथे राहणारे असून त्यांच्या बरोबर चार महिला प्रवासी आणि दोन मुले होते. निजामुद्दीन ते लोकमान्य टिळक टर्मिनसवर प्रवास करत होते. मिळालेल्या माहितीनुसार, हे दोन्ही आरोपी चरसची तस्करी करताना आपल्याबरोबर महिला आणि मुलांना सोबत घेऊन जातात. जेणेकरुन त्यांच्यावर कोणीही संशय घेऊ शकणार नाही


‘ST कर्मचार्‍यांना पहिल्या टप्प्यात कोरोनाची लस द्या’