घरCORONA UPDATEयोगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांनी केली तक्रार दाखल

योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांनी केली तक्रार दाखल

Subscribe

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉमने उडवून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशचे पोलीस प्रशासन चांगलेच हडबडले आहेत. हा धमकी देणारा मेसेज उत्तर प्रदेशच्या ११२ या पोलीस हेल्पलाईन क्रमांकावर आला आहे. सोशल मीडियाच्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर हा धमकीचा मेसेज पाठवण्यात आला आहे. हा मेसेज पाठवणाऱ्याने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ एका ठराविक समाजासाठी धोकादायक ठरले असल्याचे म्हटले आहे. या घटनेनंतर पोलिसांनी लखनौच्या गोमती नगर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केली आहे.

हेही वाचा – मुंबईतील तळीरामांसाठी खुशखबर; उद्यापासून ऑनलाईन मद्यविक्री सुरू

- Advertisement -

पोलिसांच्या सोशल मीडिया नंबरवर मेसेज

प्राथमिक तपासानुसार यामागे एका संघटनेचा हात असल्याचे सांगितले जात आहे. पोलीस, एसटीएफ, क्राइम ब्रांच, सर्विलन्ससह सर्व टीम या प्रकरणी तपास करत आहेत. युपी पोलिसांच्या ११२ मुख्यालयात गुरूवारी रात्री उशीरा साडेबारा वाजता एक व्हॉट्सअॅप मेसेज आला. हा मेसेत ११२ च्या सोशल मीडिया डेस्कच्या ७५७००००१०० या व्हॉट्सअॅप नंबरवर आला. मेसेजमध्ये लिहिले होते की, मुख्यमंत्री योगी यांना मी बॉम लावून मारणार आहे. ते (ठराविक समाजाचे नाव लिहिले) शस्त्रू बनले आहेत. हा मेसेज येताच पोलिसांनी त्वरीत अधिकाऱ्यांना माहिती दिली. या मेसेजचे गांभिर्य ओळखून पोलिसांनी कारवाईला सुरूवात केली आहे. ही धमकी ८८२८४५३३५० या मोबाईल क्रमांकावरून आल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. या नंबरची सविस्तर माहिती सध्या काढली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -