आगामी आयपीएल २०२२ ची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. इंडियन प्रिमिअर लीगच्या २०२२ च्या हंगामासाठी आणखी २ नवीन संघाचा समावेश झाला आहे. BCCI तर्फे लखनऊ आणि अहमदाबाद या दोन नवीन संघाची निवड करण्यात आली आहे. जवळपास ४ तासांच्या मोठ्या निवड प्रक्रियेनंतर १० निविदांची फाइनल टप्प्यासाठी निवड करण्यात आली आहे. निविदा प्रक्रियेत मोठमोठ्या कंपनीमध्ये नव्या फ्रँचायझीसाठी चुरस पहायला मिळाली. यामध्ये ऑल कार्गो लॉगीस्टीक्स, अदानी ग्रुप, आरपी संजीव गोएंका आणि उदय कोटक या चार कंपन्यांचा समावेश आहे. तर २ नवीन संघाच्या बोलीसाठी २२ कंपन्यांनी १० लाख रूपयांचे निविदा कागदपत्रे विकत घेतली होती.
अशा या चुरशीच्या फ्रँचायझी मध्ये आरपी संजीव गोएंका यांनी सर्वाधिक ७००० कोटींची बोली लावली. संजीव गोएंका हे या अगोदर देखील आयपीएलचे भागीदार राहिले आहेत, त्यांच्याकडे पुणे रायजिंग सुपरजायंट्सं फँचायचीचे मालकी हक्क होते आणि त्याचा संघ २ वर्षे आयपीएलमध्ये खेळला होता. आता पुन्हा एकदा नव्याने आयपीएल मध्ये पदार्पण झाल्याने संजीव गोएंका आनंदीत झाले आहेत. “हे नव्या पदार्पणातील पहिले पाऊल असून चांगला संघ तयार करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. संजीव गोएंका यांच्याकडे लखनऊ फॅंचायझीचे मालकी हक्क गेले आहेत.
तर सीवीसी कॅपिटलने या लिलावात दुसरी सर्वाधिक ५२०० कोटींची बोली लावून फँचायझी आपल्या नावावर केली आहे.
त्यामुळे आता अदानी ग्रुप आणि मँचेस्टर युनायटेडचा ग्रुप यांची फ्रँचायझी आयपीएल २०२२ मध्ये पहायला मिळणार नाही. सीवीसी कॅपिटलने अहमदाबाद फँचायझीचे मालकी हक्क जिंकले आहेत. सीवीसी कॅपिटलने नुकतीच झालेल्या ला लिगा क्लबमध्ये ही बोली जिंकली, त्यांच्याकडे आता फॉर्म्युला वन आणि रग्बी संघाचेही मालकी हक्क आहेत.