शक्तिमान बनायला गेला अन् कचऱ्याच्या गाडीत पडला, व्हिडीओ व्हायरल

lucknow garbage van pushup stunt youth injuries shaktiman up police viral video

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये एका व्यक्तीला रस्त्यावर धावत्या गाडीवर स्टंड करणं चांगलच महागात पडल आहे. हा व्यक्ती धावत्या कचऱ्याच्या गाडीवर पुशअप करत असल्याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर अनेकांचे त्याचे कौतुक केले. मात्र आता आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये पुशअपनंतर तो व्यक्ती जोरदार खाली कोसळतो. जे पाहून आता नेटीजन्स संताप व्यक्त करत आहेत. गोमती नगरच्या अतिरिक्त पोलिस उपायुक्त श्वेता श्रीवास्तव यांना हा व्हिडीओ शेअर केला आहे.

ज्यावर त्यांनी लिहिले की, ‘शक्तिशाली होऊ नका, बुद्धिमान व्हा, कृपया असे जीवघेणे स्टंट करू नका.’ आधी या व्हिडिओमध्ये काय आहे ते समजून घ्या, ज्यासाठी एडीसीपींना हे आवाहन करावे लागतेय. वास्तविक व्हिडिओमध्ये एक व्यक्ती रस्त्यावर वेगाने धावणाऱ्या कचऱ्याच्या गाडीला पुशअप करतो आणि उभा राहतो. यानंतर थोड्याच अंतरावर गाडी पोहचताच तो जोरात खाली कोसळतो.

एडीसीपी श्वेता श्रीवास्तव यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये अपघातानंतर जखमी झालेल्या मुलाचे फोटोही आहेत. ज्यात त्याला खांद्यावर जब्बर दुखापत झाल्याचे दिसतेय. हा व्हिडिओ शेअर करताना एडीसीपी श्वेता श्रीवास्तव यांनी – शक्तिमान बनत होता, काही दिवस आता बसूही शकणार नाही! कृपया असे जीवघेणे स्टंट करू नका! अस ट्विट केलं आहे.

व्हायरल झालेला व्हिडिओ शनिवारी रात्रीचा असल्याचे सांगण्यात येत आहे. समता मूलक चौकातून मनपा आरआर विभागाकडे जाणाऱ्या बंधा रस्त्यावर हा व्यक्ती स्टंटबाजी करत होता. सुमारे 24 सेकंदांच्या व्हायरल व्हिडिओमध्ये तरुण चालत्या कचऱ्याच्या छतावर पुशअप करत आहे. यानंतर तो शक्तीमान गाण्याप्रमाणे काही सेकंद चालत्या गाडीवर उभा राहतो. मात्र दुसऱ्याच क्षणी त्याचा तोल जातो आणि तो थेट रस्त्यावर पडतो. या अपघातात तरुण गंभीर जखमी झाला आहे. सध्या शक्तीमान झालेला तरुण अजूनही बेड रेस्टवर आहे.


श्रीलंकेत महागाईच्या झळा तीव्र. ‘या’ जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला!