Maharashtra Assembly Election 2024
घरक्राइमLudo Game Turns Deadly: लुडो बेतला जीवावर; कात्रीने मित्राचा कापला गळा अन्...

Ludo Game Turns Deadly: लुडो बेतला जीवावर; कात्रीने मित्राचा कापला गळा अन् हत्येनंतर स्वतःलाही संपवलं

Subscribe

मुंबई येथील साकीनाका परिसरात एक खळबळजनक घटना घडली आहे. येथील एका तरुणाने आपल्याच मित्राचा कात्रीने गळा चिरला आणि त्यानंतर या आरोपीने गळफास घेत आपलं जीवन संपवलं आहे

मुंबई:राज्यातील गुन्हेगारीचं प्रमाण प्रत्येक दिवसाला वाढताना दिसत आहे. अगदी क्षुल्लक कारणांवरून लोक समोरच्याचा जीव घेत असल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. असाच एक प्रकार आता समोर आला आहे. मुंबई येथील साकीनाका परिसरात एक खळबळजनक घटना घडली आहे. येथील एका तरुणाने आपल्याच मित्राचा कात्रीने गळा चिरला आणि त्यानंतर या आरोपीने गळफास घेत आपलं जीवन संपवलं आहे. नेमकं असं काय घडलं? की एका मित्राने दुसऱ्या मित्राचा कात्रीने गळा चिरला. त्याविषयी सविस्तर जाणून घ्या. (Ludo Game Turns Deadly Ludo Game Turns Deadly Katri cut his friend s throat and killed himself after the murder)

समोर आलेल्या माहितीनुसार, ज्या व्यक्तीची हत्या करण्यात आली. त्या व्यक्तीचा काही कारणांवरून त्याच्या मित्राशी वाद झाला होता. बुधवारी पहाटेच्या सुमारास हा सारा प्रकार घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. कुर्ल्यातील घास कम्पाऊंडमधील नवयुवक हाऊसिंग सोसायटीमध्ये हा प्रकार घडला.

- Advertisement -

सोसायटीमधील गाळा क्रमांक जी-9 मध्ये 55 वर्षीय गुलाल हमीद यांचा चिंधीपासून कपडे बनवण्याचा व्यवसाय आहे. या कारखान्याचा कारभार गुलाल हमीद हे त्याच्या मुलाच्या मदतीने पाहतात. कारखान्यामध्ये मदतनीस म्हणून गुलाल हमीद यांनी सद्दाम हुसैन रफी आलम हा 27 वर्षीय तरुण, तसंच, मोहम्मद अय्याज नवाव मलिक अहमद शेख (22) या दोघांना कामावर ठेवलं होतं.

काम संपल्यानंतर गुलाल हमीद आणि त्यांचा मुलगा घरी गेले. तर कामगार सद्दाम आलम आणि मोहम्मद अयाज शेख गाळ्यामध्येच झोपायचे. मंगळवारी रात्रीही असंच घडलं. मात्र बुधवारी सकाळी 10 वाजता या जी-9 गाळ्यामध्ये एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची माहिती एका व्यक्तीने पोलिसांना फोन करून दिली. त्यानंतर तातडीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गब्बाजी चिमटे हे त्यांच्या सहकाऱ्यांसोबत घटनास्थळी पोहोचले. मात्र, गाळ्याचा दरवाजा बंद असल्याने पोलिसांनी तो तोडला आणि आत प्रवेश केला. समोर पाहिलं तेव्हा एका व्यक्तीने गळफास घेतला होता, तर दुसरी व्यक्ती जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं पोलिसांना आढळून आलं. दोघांचेही मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.

- Advertisement -

नेमकं काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे 3 ते 4 वाजण्याच्या सुमारास सद्दाम आणि मोहम्मद अय्याजमध्ये वाद झाला. रागाच्याभरात सद्दामने कात्रीने मोहम्मद अय्याजच्या गळ्यावर अनेक वार करून त्याची हत्या केली. त्यानंतर सद्दामने गाळ्याच्या छताला फास लावून आत्महत्या केली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, त्यांच्यात असा नेमका काय वाद झाला याचा शोध ते घेत आहेत. साकीनाका पोलिसांनी 2 अपमृत्यूची नोंद केली असून, मृत अरोप सद्दाम विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. वादाचे मूळ कारण लुडो गेम होता असं समजतं.

(हेही वाचा: Hind Kesari : महाराष्ट्राच्या पठ्ठ्याने मारले हिंद कसेरीचे मैदान; समाधान पाटील विजेता)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -