Thursday, June 1, 2023
27 C
Mumbai
घर मुंबई नववीत असताना पहिला मोर्चा काढला; शरद पवारांनी आठवणींना दिला उजाळा

नववीत असताना पहिला मोर्चा काढला; शरद पवारांनी आठवणींना दिला उजाळा

Subscribe

मुंबई : शरद पवार (Sharad Pawar) यांच्या जीवनावरील ‘लोक माझे सांगाती’ या आत्मचरित्रपर पुस्तकाचे प्रकाशन आज मुंबईत करण्यात आले. यावेळी शरद पवार यांनी वक्तव्य केले की, मला विद्यार्थी चळवळीत आधिक रस होता. त्यामुळे नववीत असताना पहिला मोर्चा काढला. १९६७ पर्यंत मला आमदार म्हणून संधी मिळाली आणि त्यानंतर मी सतत विविध पदांवर आहे.

पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात बोलताना शरद पवार आपल्या राजकीय आठवणींमध्ये रमल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी सांगितले की, सार्वजनिक जीवन सोडल्यानंतर अनेक गोष्टी पाहायला मिळतात, अनेक व्यक्तींना भेटण्याची संधी मिळते आणि त्यातून काहीना काही शिकायला मिळते. लोकांनी पहिल्यांदा वाचायला शिकले पाहिजे. व्यक्ती वाचन हे तुमच्या सर्वांच्या ज्ञानात भर टाकणार असेल. माझे वडील बंधू आप्पासाहेब पवार नगरच्या प्रवरा साखर कारखाण्यात कृषी अधिकारी होते. त्यांनी मला नगरला बोलावून रयत शिक्षण संस्थेसोबत काम करण्यास सांगितले. त्यानंतर मी हळूहळू राजकारणाकडे वळलो.

- Advertisement -

मी काँग्रेस पक्षाचा सदस्य झाल्यानंतर पुण्यामध्ये आलो. त्यानंतर मला मुंबईत काम करायला सांगितले. यावेळी महाराष्ट्रातील मोठ्या नेत्यांशी संपर्क आला. त्यावेळी अनेक मोठे नेते हॉटेलमध्ये उतरत नव्हते. ते पक्षाच्या कार्यालयात किंवा कार्यकर्त्यांच्या घरी उतरत होते. त्यावेळी इंदिरा गांधी यांच्यांशी संपर्क आला. त्यांनी युनोस्कोच्या संघटनेसाठी माझी निवड केली. मला जपान, अमेरिकामध्ये जाण्याची संधी मिळाली. जपानला गेल्यानंतर त्यांच्या पंतप्रधानच्या कार्यालयात काम केले. त्यावेळी जपानमध्ये पंतप्रधानांचे कार्यक्रमाचे नियोजन आम्ही केले. आंतरराष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीच्या कार्यालयात काम करण्याची संधी मिळाली.

मी दौऱ्यावर असताना मला बोलावून घेतले आणि विधानसभेला उभे राहण्याची संधी दिली. १९६७ मध्ये निवडणुकीचे पहिले तिकीट मिळाले, परंतु निवडणूक सोपी नव्हती. अनेक वर्षे युवकांच्या चळवळीत काम केले, विद्यार्थी चळवळीत काम केल्यामुळे मला निवडणुकीत फायदा झाला आणि मी निवडून आलो. पण मला विद्यार्थी चळवळीत आधिक रस होता. मी नववीत असताना पहिला मोर्चा काढला. १९६७ पर्यंत मला आमदार म्हणून संधी मिळाली. त्यानंतर गेली 56 वर्षे सतत मी विविध पदांवर आहे. यानंतर शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदारुन निवृत्ती घेत असल्याचे स्पष्ट केले.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -