घरमुंबई मढ- मार्वेतील कथित अवैध स्टुडिओ प्रकरणी चौकशी समिती, CRZ आणि NDZ च्या...

 मढ- मार्वेतील कथित अवैध स्टुडिओ प्रकरणी चौकशी समिती, CRZ आणि NDZ च्या नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप

Subscribe

मुंबई – मढ मार्वे येथील कथित अवैध स्टुडिओ प्रकरणात आदित्य ठाकरे आणि अस्लम शेख यांच्या अडचणी वाढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबई महापालिकेकडून याप्रकरणाची चौकशी करणार आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी समितीची स्थापना केली. त्यांचा अहवाल 4 आठवड्यांत सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

मढ मार्वे येथील तयार करण्यात आलेल्या 49 फिल्म स्टुडिओच्या कथित भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे. भाजप नेते किरीट सोमय्यांनी मढ मार्वे येथील फिल्म स्टुडिओबाबत भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात काँग्रेसचे कॅबिनेट मंत्री अस्लम शेख यांनी हे स्टुडिओ बांधल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता. या प्रकरणी CRZ आणि NDZ च्या नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप केला आहे.

- Advertisement -

किरीट सोमय्यांचे ट्विट –

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मालाडच्या मढ, मार्वे, इरानगल आणि भाटी येथे 49 बेकायदेशीर स्टुडिओ बांधल्याचा आरोप केला होता. बीएमसीनं चौकशीचे आदेश दिल्यानंतर किरीट सोमय्या यांनी, चौकशी पूर्ण झाल्यानंतर हे सिद्ध होईल की, उद्धव ठाकरे सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असलेले असलम शेख आणि आदित्य ठाकरे हे या घोटाळ्यात सहभागी होते, असा आरोप त्यांनी केला आहे.

- Advertisement -

महापालिका आयुक्तांचे चौकशीचे आदेश –

मुंबई महापालिका आयुक्त चहल यांनी जारी केलेल्या चौकशी आदेशात म्हटले आहे की, मालाड, मार्वे आणि लगतच्या भागात सीआरझेड सह 49 बेकायदेशीर स्टुडिओचे बांधकाम आणि एमडीझेडचे उल्लंघन केल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. ज्यांना 2021-22 मध्ये नोटिसाही बजावण्यात आल्या होत्या. बनावट कागदपत्रे, खोट्या परवानगीच्या आधारे हजारो चौरस मीटर जागेवर अनधिकृतपणे स्टुडिओ उभारण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. यात बीएमसी आणि एमसीझेडएमएच्या अधिकाऱ्यांचे संगनमत असल्याचे आरोपात म्हटले आहे. आरोपांचे गांभीर्य आणि बेकायदा बांधकामाची तक्रार पाहता उपायुक्त हर्षद काळे यांना चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. काळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून 4 आठवड्यांत अहवाल सादर करतील.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -