घरमुंबईमधुसूदन कालेलकर यांच्या आठवणींना उजाडा

मधुसूदन कालेलकर यांच्या आठवणींना उजाडा

Subscribe

मधुसूदन कालेलकर यांच्या ९५ वी जयंती एम आय जी क्लब वांद्रे (पूर्व) यांच्यातर्फे क्लबच्या रुफ टॉप वर २३ मार्च रोजी संध्याकाळी ७ वाजता एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला आहे.

मधुसूदन कालेलकर यांनी मराठी आणि हिंदी मिळून १११ चित्रपट आणि २९ नाटके लिहिली आहेत. त्यांचा २२ मार्च हा जन्मदिवस! यावर्षी त्यांची ९५ वी जयंती एम आय जी क्लब वांद्रे (पूर्व) यांच्यातर्फे क्लबच्या रुफ टॉप वर २३ मार्च रोजी संध्याकाळी ७ वाजता एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला आहे. कालेलकरांनी लिहिलेली मराठी गाणी आणि त्यांनी लिहिलेल्या हिंदी चित्रपटातील गाणी रुपेरी पडद्यावर व्हिडिओ स्वरूपात सादर होणार आहेत. गाण्यांच्या संदर्भातले काही मजेदार किस्सेही सांगितले जातील. यावेळी सरगम मुंबई या संस्थेस पत्रकार रमेश उदारे यांच्या स्मरणार्थ मानचिन्ह आणि रोख पारितोषिक दिले जाईल. मधुसूदन कालेलकर यांनी लिहिलेल्या ‘सागरा प्राण तळमळला’ या नाटकाच्या नवीन आवृत्तीचेही प्रकाशन केले जाणार आहे. या कार्यक्रमास सुप्रसिद्ध अभिनित्री आशा काळे नाईक आणि अलका कुबल आठल्ये या उपस्थित राहणार आहेत. गाण्याचा कार्यक्रम स्वरमुग्धा आर्ट्स तर्फे विवेक पुणतांबेकर आणि कृष्णकुमार गावंड हे सादर करणार असून सूत्रधार श्रीकांत कुलकर्णी आहेत. हा कार्यक्रम एम. आय. जी. क्लबने सर्व संगीत प्रेमी रसिकांसाठी विनामूल्य ठेवला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -