घरमुंबईराज्यसभा निवडणुकीसाठी 'असे' असेल संख्याबळ, महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये संघर्ष

राज्यसभा निवडणुकीसाठी ‘असे’ असेल संख्याबळ, महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये संघर्ष

Subscribe

राज्यसभा निवडणुकीच्या सहा जागांसाठी महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात रस्सीखेच सुरु आहे. उद्या (3 जून) उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटचा दिवस आहे. त्यामुळे जर एका उमेदवाराने माघार घेतली नाही तर अटीतटीची ही लढत होणार आहे. काय असणार आहे पक्षीय बलाबल जाणून घेऊया…

असा काढला जातो आमदारांचा कोठा –

- Advertisement -

राज्यसभेसाठी राज्यातील एकूण आमदारांच्या संख्येला राज्यसभेच्या होणाऱ्या निवडणुकीच्या आकड्याला 1 जोडून भागले जाते. यामध्ये पहिल्या नंबरने जो आकडा येतो त्याला तेवढी मते मिळवावी लागतात. विधानसभेचे संख्याबळ 288 आहे. यातून फॉर्म्युल्याचा वापरू करुन राज्यसभेसाठीच्या मतदानाचा कोटा ठरवला जातो. फॉर्म्युल्यानुसार 288/ [6+1] +1 = 42 असे उत्तर येते. याचा अर्थ राज्यसभेसाठी उमेदवाराला पहिल्या पसंतीची 42 मते मिळवावी लागतील.

विजयासाठी हवे इतके मतदान –

- Advertisement -

महाराष्ट्रात राज्यसभेच्या 6 जागांसाठी 10 जूनला मतदान होणार आहे. राज्यात एकूण 288 विधानसभा सदस्य आहेत. मात्र, मुंबईतील अंधेरी पूर्वचे शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यामुळे विधानसभेतील आमदारांची संख्या 287 आहे. अशा परिस्थितीत फॉर्म्युलानुसार 288/6+1+1 = 42 म्हणजेच एक राज्यसभा उमेदवाराला 42 मते मिळवावी लागतील. भाजपकडून दोन उमेदवार विजयी होतील. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडे एक-एक उमेदवाराला विजयी होईव येवढे संख्याबळ आहे. मात्र, राज्यात महाविकास आघाडी असल्याने ते आणखी एक उमेदवार राज्यसभेवर पाठवू शकतात. त्यामुळे शिवसेनेने राज्यसभेसाठी दुसरा उमेदवार रिंगणात उतरवला आहे.

सत्ताधारी महाविकास आघाडीचे आमदार –

शिवसेना – 55
राष्ट्रवादी – 53
काँग्रेस – 44
बहुजन विकास आघाडी – 3
समाजवादी पार्टी – 2
प्रहार जनशक्ती पार्टी – 2
माकप – 1
शेकाप – 1
स्वाभिमानी पक्ष – 1
क्रांतिकारी शेतकरी पार्टी – 1
अपक्ष – 9

एकूण संख्याबळ – 172

विरोधी पक्ष भाजपकडील आमदार –

भाजप – 106
जनसुराज्य शक्ती – 1
राष्ट्रीय समाज पक्ष – 1
अपक्ष – 4

एकूण संख्याबळ – 112

भूमिका न घेतलेले पक्ष –

एमआयएम – 2
मनसे – 1

एकूण – 3

भाजपचे अपक्ष आमदार

1) प्रकाश आव्हाडे- इचलकरंजी
2) राजेंद्र राऊत- बार्शी
3) महेश बालदी- उरण
4) रवी राणा- बडनेरा

महाविकास आघाडीचे अपक्ष आमदार –

1) श्यामसुंदर शिंदे- लोहा
2) किशोर जोरगेवार- चंद्रपूर
3) गीता जैन- मीरा भाईंदर
4) नरेंद्र भोंडेकर- भंडारा
5) आशिष जयस्वाल- रामटेक
6) संजय शिंदे- करमाळा
7) चंद्रकांत पाटील- मुक्ताईनगर
8) मंजुषा गावित- साक्री.
9) विनोद अग्रवाल- गोंदिया

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -