Thursday, April 15, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई डान्स बारकडून हफ्ता घेणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर २ दिवसांत कारवाई करणार - अनिल...

डान्स बारकडून हफ्ता घेणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर २ दिवसांत कारवाई करणार – अनिल देशमुख

घोडबंदर रोडवरील हुक्का पार्लरच्या मालकावर २४ तासाच्या आत कारवाई करण्यात येईल

Related Story

- Advertisement -

कोरोना काळात आणि राज्यात कायद्यानुसार डान्सबार वर बंदी असतानाही मुंबईत आणि बोरिवली ते काश्निरा भागात डान्सबार सर्सास सुरु आहेत. रात्रभर हे डान्सबार सुरु असतात. या बारमुळे त्या परिसरातील नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जात आहे. या डान्स बार चालकांना प्रश्न विचारल्यास पोलीस अधिकारी हफ्ता घेत असल्याचे त्यांनी सांगितले असल्याचे विरोधकांनी विधानपरिषदेत (Legislative Council) सांगितले. यावर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कडक कारवाई करु असे सांगितले आहे. मुंबईसह ठाण्यामध्ये सुरु असणाऱ्या हुक्का पार्लर आणि बारवरही कारवाया सुरु असल्याचेही गृहमंत्र्यांनी सांगितले आहे.

विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी काश्निरा ते बोरिवलीमध्ये अनधिकृतरित्या डान्स बार रात्रभर सुरु असल्याचे सांगितले. तसेच त्या परिसरातील पोलीस अधिकाऱ्यांना या बारकडून मोठे हफ्ते येत असल्याचेही प्रवीण दरेकर यांनी सांगितले. या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करुन निलंबित करण्याची मागणी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी विधानपरिषदेत केली. यावेळी भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी घोडबंदर येथील हुक्का पार्लरचा प्रश्न मांडला आहे. या हुक्का पार्लरच्या मागे गृहमंत्र्यांना हफ्ता झाला असल्याचे हुक्का पार्लरच्या मालकाने सांगितल्याचे निरंजन डावखरे यांनी सांगितले.

- Advertisement -

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विरोधी पक्षनेत्यांच्या उत्तराला प्रत्त्युत्तर देताना संबंधित हुक्का पार्लर मालकांवर कारवाई करणार असल्याचे सांगितले. तसेच डान्सबारकडून हफ्ता घेणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल. पुढील २ दिवसांच्या आत ह्या प्रकरणाचा छडा लावण्यात येईल असे आश्वासनही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहे. घोडबंदर रोडवरील हुक्का पार्लरच्या मालकावर २४ तासाच्या आत कारवाई करण्यात येईल असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आश्वासन दिले आहे.

- Advertisement -