घरअर्थसंकल्प २०२२हे सरकार दाऊदच्या दबावाखाली काम करतंय- देवेंद्र फडणवीस

हे सरकार दाऊदच्या दबावाखाली काम करतंय- देवेंद्र फडणवीस

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनात वेगवेगळ्या मुदयांवरून विरोधकांनी राज्य सरकारला सळो की पळो करून टाकले आहे. विरोधी नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पेन ड्राईव्ह बॉम्बमुळे महाविकास आघाडीतील अनेक नेते अडचणीत आले आहेत. यादरम्यान, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ईडीच्या कारवाईविरोधात केलेली याचिका आज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारला लक्ष्य केले.

ते म्हणाले की कालपर्यंत तुम्ही सभागृहात सांगत होता की नवाब मलिक यांच्याबद्दल उच्च न्यायालयात याचिका प्रलंबित आहे. पण आज तर उच्च न्यायालयाने ईडीची कारवाई योग्य असल्याचे म्हटलंय. मग आता माझा सवाल आहे की दाऊदच्या माणसाबरोबर संगनमत करून आर्थिक गैरव्यवहार करणारे मंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा सरकार कधी घेणार? जर राजीनामा घेण्यात आला नाही तर राज्य सरकार दाऊदच्या दबावाखाली काम करतयं हे स्पष्ट आहे. असा आरोप यावेळी फडणवीस यांनी केला.

- Advertisement -

जो खड्डा खणतो, तोच त्यात पडतो

यावेळी फडणवीस यांनी सरकारकडून विरोधकांवर होत असलेल्या कारवाईचा समाचार घेतला. असल्या कारवाईला आम्ही घाबरत नाही. कितीही गुन्हे दाखल करा आम्ही न्यायालयात जाऊ. पण भ्रष्टाचाराविरोधात बोलत राहू. कितीही खोटे गुन्हे दाखल करा. आम्ही त्याची पर्वा करत नाही. लोकशाहीला पायदळी तुडवण्याचे काम सरकार करतय. पण सरकारला सांगू इच्छितो की जो खड्डा खणतो तोच त्या खड्ड्यात पडतो.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -