Sunday, August 1, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मुंबई मुख्यमंत्र्यांच्या 'महाजनादेश यात्रे'चा शुभारंभ अमित शहा तर समारोप नरेंद्र मोदी करणार

मुख्यमंत्र्यांच्या ‘महाजनादेश यात्रे’चा शुभारंभ अमित शहा तर समारोप नरेंद्र मोदी करणार

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १ ऑगस्ट पासून मुख्यमंत्र्यांच्या 'महाजनादेश यात्रे'चा शुभारंभ होणार असून, यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जात आहे.

Related Story

- Advertisement -

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १ ऑगस्ट पासून मुख्यमंत्र्यांच्या ‘महाजनादेश यात्रे’चा शुभारंभ होणार असून, यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जात आहे. तर या महाजनादेश यात्रेच्या समारंभाला स्वतः पतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असल्याचीही माहिती मिळत आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील याची पत्रकार परिषदेतून लवकरच घोषणा करणार आहेत. लोकसभा निवडणुकीत देशासह राज्यात देखील भाजपला घवघवीत यश मिळाल्यानंतर आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा कामाला लागले असून, याचसाठी १ ऑगस्टपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाजनादेश यात्रा काढणार आहेत. त्यामुळे भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांनी तसेच अमित शहा आणि पंतप्रधान मोदींनी या यात्रेला उपस्थितीती दर्शवावी, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केल्याची माहिती समोर येत आहे.

अशी असेल मुख्यमंत्र्यांची ‘महाजनादेश यात्रा’

 • १ ऑगस्टपासून मोझरीतून महाजनादेश यात्रेला सुरुवात होईल
 • पहिला टप्पा – मोझरी ते नंदुरबार
 • दुसरा टप्पा – अकोले, अहमदनगर, नाशिक
 • ही यात्रा २५ दिवस चालेल
 • मुंबई वगळता ग्रामीण भागात ही यात्रा निघेल
 • ३० जिल्ह्यातून ही यात्रा जाणार आहे
 • १५२ विधानसभा क्षेत्रात ही यात्रा निघेल
 • या यात्रेनंतर महाराष्ट्र काबीज करण्याचा निर्धार
 • साडेचार हजार किलोमीटरहून अधिक ही यात्रा असेल
 • ३०० हून अधिक सभा होणार आहेत
 • यामध्ये जाहीर सभा १०४, २२८ स्वागत सभा (स्वागत सभेत रथावरून १० मिनिटं मार्गदर्शन सभा होणार)
 • त्यानंतर भाजपची विजय संकल्प सभा देखील होईल
 • या यात्रेत एक रथ असणार आहे. या रथातून मुख्यमंत्री
 • रथामध्ये व्यासपीठ तयार करण्यात येणार आहे. जेव्हा एखाद्या ठिकाणी सभा घ्यायची असेल तिथे रथात व्यासपीठ तयार होईल. ज्यात माईकची व्यवस्था देखील करण्यात येणार आहे. एलइडी रथाची व्यवस्था देखील करण्यात येणार आहे. यामध्ये चित्रफित दाखवली जाईल
 • प्रत्येक ठिकाणी पत्रकार परिषद होईल
 • नाशिक तीर्थ क्षेत्रावर समारोप होईल
- Advertisement -