घरमुंबईMaharashtra Budget 2021: महाराष्ट्रात राज्य संग्रहालय उभारणार, पर्यटन धोरणात मोठ्या घोषणा

Maharashtra Budget 2021: महाराष्ट्रात राज्य संग्रहालय उभारणार, पर्यटन धोरणात मोठ्या घोषणा

Subscribe

पर्यटनामध्ये एतिहासिक आणि प्राचीन मंदिरांचे जतन करण्याचेही राज्य सरकरने घोषित केले आहे.

राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2021) सादर केला आहे. राज्याच्या २०२१ -२२ या वर्षाच्या अर्थसंकल्पात पर्यटना विभागावर अधिक भर दिला आहे. राज्यात पर्टन व्यवसाय वाढवण्यासाठी तसेच विदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्राच्या नव्या पर्यटन धोरणात १३६७ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. महाबळेश्वर, पाचगणी, लोणार, सरोवराचा विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे. तसेच विदर्भात अभयारण्यात मोठ्या सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. विदर्भात फुलपाखरु उद्यान, व्याघ्र प्रकल्पाला प्राधान्य देण्यात येणार आहे. विदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विदर्भात येत्या काळात अनेक सोयी सुविधांचे निर्मिती केली जाणार आहे.

राज्यातील पर्यटन व्यवसाय वाढवण्यासाठी महाबळेश्वर, पाचगणी, लोणार सरोवराचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. यातून या पर्यटन स्थळांच्या विकासात भर पडणार आहे. वरळी डेअरीच्या जागेवर पर्यटन केंद्र उभारण्याचे काम लवकरच काम सुरु करण्यात येणार आहे. पर्यटन विभागासाठी १ हजार ३६७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर महाराष्ट्रात संग्रहालय उभारण्यात येणार आहे. सांस्कृतिक कार्य विभागासाठी १२१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

- Advertisement -

पर्यटनामध्ये एतिहासिक आणि प्राचीन मंदिरांचे जतन करण्याचेही राज्य सरकरने घोषित केले आहे. यासाठी ८ प्राचीन मंदिरांची निश्चिती करण्यात आली आहे. तसेच प्राचीन मंदिरांच्या जतनासाठी यंदा १०१ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. पर्यटन केंद्र उभारण्यासाठी प्राचीन मंदिरांच्या संवर्धनासाठी काही मंदिराची निवड करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीसाठी पथदर्शी प्रकल्प, ३ वर्षात दरवर्षी १०० कोटी देणार तसेच रोजगार हमी विभागासाठी १,२३१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर गोंडवाना थीम पार्कची निर्मिती करुन सफारी सुरु करण्यात येणार आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सिंह सफारीवर भर राणीची बाग प्राणीसंग्रहालयात नवे प्राणी आणण्यात येतील तसेच वनविभागास १,७२३ कोटींची मंजुरी देण्यात आली आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -