घरCORONA UPDATECoronavirus: राज्याचा कॅबिनेट मंत्री कोरोना पॉझिटिव्ह; मात्र प्रकृती स्थिर

Coronavirus: राज्याचा कॅबिनेट मंत्री कोरोना पॉझिटिव्ह; मात्र प्रकृती स्थिर

Subscribe

ठाणे महानगरपालिका क्षेत्रात आज ११ नव्या रुग्णांची नोंद झालेली आहे. नव्या रुग्णांसहीत ठाणे शहरातील एकूण रुग्णसंख्या १७८ वर पोहोचली आहे. यामध्ये राज्याच्या एका कॅबिनेट मंत्र्यांची चाचणी देखील पॉझिटिव्ह आली असल्याची माहिती मिळत आहे. यापुर्वी या मंत्र्यांची टेस्ट निगेटिव्ह आलेली होती. मात्र मंगळवारी त्यांना श्वास घेण्यास त्रास जाणवू लागल्याने एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नियमाप्रमाणे नव्या रुग्णाची कोरोना टेस्ट घेण्यात येते. त्याप्रमाणे या मंत्र्यांची टेस्ट घेतली असता ती पॉझिटिव्ह आली आहे. मात्र त्यांची प्रकृती पुर्णपणे व्यवस्थित असल्याची माहिती मिळत आहे.

इंडिया टु डे या संकतेस्थळाने दिलेल्या बातमीनुसार ठाण्यातील एक कॅबिनेट मंत्र्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. नुकतेच या नेत्याला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नव्या रुग्णाची नियमाप्रमाणे कोरोना टेस्ट करावी लागते. त्याप्रमाणे या नेत्याची टेस्ट करण्यात आली. आज रिपोर्ट आल्यानंतर ही टेस्ट पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. ठाणे शहरात काही दिवसांपूर्वी दोन पत्रकार आणि मुंब्रा पोलीस ठाण्यातील ३ पोलिसांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. मुंब्रा पोलीस स्थानकातील ९० टक्के कर्मचारी हे क्वारंटाइन करण्यात आले होते. त्यानंतर आज या दोनही पत्रकारांची टेस्ट निगेटीव्ह आली असून मुंब्रा पोलीस स्थानकातील एक अधिकारी देखील बरा झालेला आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -