Sunday, April 11, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी विरोधकांकडून राज्यात शिमगा, पण टिकाकारांना लवकरच उत्तर देईन - मुख्यमंत्री

विरोधकांकडून राज्यात शिमगा, पण टिकाकारांना लवकरच उत्तर देईन – मुख्यमंत्री

कोरोनाच्या लढाईविरोधात विरोधकांनीही रस्त्यावर उतरावे

Related Story

- Advertisement -

राज्यात राजकीय पक्षांना कोरोनाच्या लढाईत होणाऱ्या राजकारणाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच खडे बोल सुनावले. जनतेच्या जिवाशी खेळू नका असे आवाहन करतानाच त्यांनी कोरोनाविरोधातल्या लढाईत रस्त्यावर उतरा असेही आवाहन त्यांनी यावेळी केले. तसेच राज्यातील लॉकडाऊनबद्दल मत मांडणारे आनंद महिंद्रा यांनाही त्यांनी टोला लगावला. कोरोनाची रोजची वाढणारी रूग्णसंख्या पाहता अपुऱ्या पडणाऱ्या व्यवस्थेसाठी काही मदत करणार का असाही सवाल त्यांनी केला. अनेक ठिकाणी उसळणारी गर्दी, फुललेल्या बाजारपेठा याठिकाणची गर्दी पाहता माझ्या डोळ्यादेखत मी महाराष्ट्राचे वाईट चित्र पाहू शकत नाही. त्यामुळे दोन दिवसाचा अल्टीमेट त्यांनी जनतेला दिला आहे. यामध्ये सुधार झाला नाही तर तज्ञांसोबत बोलूनच कडक निर्बंध लादण्याचा निर्णय घेईन असाही इशारा त्यांनी यावेळी दिला. विरोधकांकडून राज्यात सुरू असलेल्या शिमग्याचाही त्यांनी यावेळी ठाकरे शैलीत समाचार घेतला.

राज्यात नुकतीच होळी झाली, रंगपंचमी झाली, पण विरोधकांनी जो काही शिमगा घातला आहे, त्या शिमग्यालाही मी लवकरच उत्तर देईन असेही उद्धव ठाकरे म्हणाले. त्याचवेळी लॉकडाऊनला विरोध करताना पैसे अकाऊंटला जमा करण्यापासून ते अनेक ठिकाणी बंधने घालण्यावर टीका व टिप्पणी होत असल्यासाठीही त्यांनी नाराजी व्यक्त केली. विरोधकांकडून कोरोनाविरोधातल्या लढाईत सहकार्य करण्याएवजी रस्त्यावर उतरण्याची भाषा केली जात आहे. त्यामुळेच रस्त्यावर तर उतरावेच लागेल, पण राज्यातील दमलेली आरोग्य यंत्रणा पाहता आता विरोधकांनी रस्त्यावर उतरण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. राज्यातील आरोग्य यंत्रणेवर सातत्याने ताण आलेला आहे. त्यामध्ये अनेक डॉक्टर्स, नर्स, आरोग्य सेवक असा मोठ्या प्रमाणावर कर्मचारी वर्ग हा कोरोनातून आता सावरत आहे. राज्यातील आरोग्य यंत्रणेची तोकडी व्यवस्था आणि कर्मचाऱ्यांची मर्यादित संख्या पाहता आता विरोधकांनी कोरोनाविरोधातील लढाईत उतरण्याची गरज असल्याचे उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले. विरोधकांकडून होणारे आरोप पाहता त्यांनी विरोधकांनी राजकारण करत जनतेच्या जिवाशी खेळू नये असेही आवाहन यावेळी केले. मास्क न लावण्यात कोणतेही शौर्य नाही. त्यामुळेच मास्क लावण्यात कोणतीही लाज बाळगायची गरज नाही असेही ते म्हणाले. राज्यात अनेक ठिकाणी बाजारपेठा फुलल्या आहेत, तसेच अनेक ठिकाणी सभांनाही मोठी गर्दी होत आहे. त्यामुळेच जनतेच्या हितासाठीच पावल उचलण्याची गरज आहे. जीव वाचला तर रोजगारही मिळेल. म्हणूनच आज लॉकडाऊनचा ईशारा देत आहे, दोन दिवसात उपाय आढळला नाही, तर आहे ती परिस्थिती स्विकारा असेही उद्धव ठाकरे म्हणाले. त्यामुळेच प्रत्येक ठरवले पाहिजे की लॉकडाऊन हवा की नको.

- Advertisement -

आनंद महिंद्रा यांनी लॉकडाऊनबाबत केलेल्या टिप्पणीवरही मुख्यमंत्री कडाडले. राज्यातील कोरोनाची वाढती रूग्णसंख्या पाहता, येत्या काळात ऑक्सिजन पुरवठा, वेंटिलेटर्स, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी हे कमी पडू शकतात. म्हणूनच हे सगळी यंत्रणा, डॉक्टर्स आणि नर्सेस देण्यासाठी हे उद्योगपती मदत करणार का ? असाही सवाल त्यांनी यावेळी केला. कोरोनामुळे होणारी आगामी परिस्थिती रोखण्याची जिद्द आहे का या उद्योगपतींच्या टिप्पणीत आहे का असाही सवाल त्यांनी केला.

- Advertisement -