घरमुंबईमहाराष्ट्राचा चित्ररथ आता शिवाजीपार्क येथील संचलनात!

महाराष्ट्राचा चित्ररथ आता शिवाजीपार्क येथील संचलनात!

Subscribe

प्रजासत्ताकदिनी दिल्लीच्या राजपथावरील संचलनात सहभागी होऊ न शकलेला महाराष्ट्राचा ‘स्वराज्याचे सरखेल दर्यासारंग – कान्होजी आंग्रे’ या विषयावरील चित्ररथ आता येत्या प्रजासत्ताक दिनी मुंबईतील शिवाजीपार्क येथील संचलनात सहभागी होणार आहे. ज्यांचे अश्वदल त्यांची पृथ्वी अन् ज्यांचे आरमार त्यांचा समुद्र हे लक्षात घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी प्रथम आरमार उभारले. छत्रपतींच्या या आरमार उभारणीत अनेक वीरांनी योगदान दिले त्यापैकी एक म्हणजे ‘कान्होजी आंग्रे’. या चित्ररथातून स्वराज्याची सेवा करताना कान्होजींच्या नेतृत्वाखाली सागरामध्ये स्वराज्याचे भगवे तोरण कसे दिमाखाने चढले, फडकू लागले, त्यांनी इंग्रज, डच आणि फ्रेंच यांच्यावर समुद्रावरून कसे नियंत्रण ठेवले, याची शौर्यगाथा उलगडून सांगितली जाणार आहे.

काय असेल या चित्ररथावर?

कान्होजी आंग्रे यांच्या कार्याचा गौरव करणाऱ्या या चित्ररथाची बांधणी कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी केली आहे. जहाजावर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा उभा करण्यात आला असून कान्होजी आंग्रे यांच्या कार्याची माहिती देणारा जिवंत देखावा यानिमित्ताने सादर करण्यात येणार आहे. या संचलनात ६० कलावंत सहभागी होत असून मुंबईसह महाराष्ट्रातील नागरिकांना लाठ्या-काठ्या, तलवार बाजी याचेही दर्शन यावेळी होईल.

- Advertisement -

दिल्लीत चित्ररथ नाही!

प्रजासत्ताक दिनी दरवर्षी दिल्लीच्या राजपथावर पथसंचलन केलं जातं. त्या नयनरम्य सोहळ्यामध्ये यंदा महाराष्ट्राचा चित्ररथ समाविष्ट होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. रोटेशन पद्धतीमुळे महाराष्ट्राच्या चित्ररथाला नाकारण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -