घरमुंबईमुंबईत 'महाविकास' आघाडीची बैठक; खाते वाटपावर चर्चा?

मुंबईत ‘महाविकास’ आघाडीची बैठक; खाते वाटपावर चर्चा?

Subscribe

मुंबईच्या नेहरु सेंटरमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात बैठक सुरु असल्याची माहिती समोर आली असून ही बैठक खाते वाटपा संदर्भात असल्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून भाजपला सत्तेपासून दूर ठेवणाऱ्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येऊन ‘महाविकासआघाडी’चे सरकार स्थापन केले आहे. सरकार जरी स्थापन केले असले तरी मात्र, अद्याप कोणाला कोणते मंत्रीपद द्यायचे याचा अद्याप घोळ सुरु आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईच्या नेहरु सेंटरमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात बैठक सुरु असल्याची माहिती वृत्तवाहिनीतून समोर आली आहे.

या बैठकीला कोण आहेत उपस्थित

या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यसह शिवसेनेकडून एकनाथ शिंदे, सुभाष देसाई तर राष्ट्रवादीकडून अजित पवार आणि जयंत पाटील उपस्थित आहेत.

- Advertisement -

खाते वाटप रखडले

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर एक महिना उलटून देखील सत्ता स्थापन होत नव्हती. अखेर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी एकत्र येऊन ‘महाविकास’ आघाडी स्थापन केली. तिन्ही पक्षांमध्ये सत्ता वाटपाचे सूत्रही निश्चित झाले आहे. लवकरच अन्य मंत्र्यांचाही शपथविधी होईल, असे सांगितले जात होते. परंतु, आठदिवसांत फक्त मुख्यमंत्र्यांसह सहा मंत्र्यांना शासकीय बंगल्यांचे आणि मंत्रालयातील दालनांचे वाटप करण्यात आले. परंतु, खाते वाटप अजून रखडलेले आहे. याच पार्श्वभूमीवर ही बैठक होत असल्याची शक्यता नाकारता येत नाही.


हेही वाचा – शिवसेना-भाजप पुन्हा युती होणार? उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ विधानामुळे चर्चांना उधाण

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -