मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये मतदारांनी सकाळपासून रांगा लावण्यास सुरुवात केली आहे. मुंबईतही मतदारांनी मतदान प्रक्रियेत उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला आहे. दुपारी 05 वाजेपर्यंत मुंबईमध्ये 49.07 टक्के मतदान झाले आहे. मुंबईतील महत्त्वाच्या 10 मतदारसंघामध्ये दुपारी मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. यावेळी सर्वाधिक मतदान हे भांडूप येथे झाले असून 5 वाजेपर्यंत 60.18 टक्के मतदान झाल्याचे समोर आले आहे. तर, कुलाबा येथे 41.64 टक्के मतदान झाल्याचे समोर आले आहे. (Maharashtra Election 2024 6.25 percent voting in Mumbai in two hours)
राज्यात 288 विधानसभा मतदारसंघासाठी एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सायंकाळी 06 वाजेपर्यंत मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. मतदारांनी मोठ्या संख्येने घराच्याबाहेर पडून आपला मतदानाचा हक्क पार पाडावा, असे आवाहन नेतेमंडळी, सिनेअभिनेता-अभिनेत्री यांच्याकडून करण्यात येत आहे. निवडणूक आयोगाकडून दर दोन तासांनी कोणत्या मतदारसंघात किती टक्के मतदान झाले? याबाबतची माहिती प्रसिद्ध करण्यात येत असते. त्यानुसार, सकाळी 09 वाजेपर्यंत मुंबईत 6.25 टक्के आणि त्यानंतर 11 वाजेपर्यंत 15.78 टक्के मतदान झाले आहे. तर, 1 वाजेपर्यंत मुंबई शहर 27.73 टक्के तर उपनगरात 30.43 टक्के मतदान झाले होते. दुपारी 03 वाजेपर्यंत मुंबईमध्ये 39.34 टक्के झाले होते. तर मुंबईतील 36 मतदारसंघांपैकी प्रमुख 10 मतदारसंघांची टक्केवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
दुपारी 05 वाजेपर्यंतचे मतदान?
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, दुपारी 05 वाजेपर्यंत धारावीमध्ये 46.15 टक्के, सायनमध्ये 50.54, चेंबूरमध्ये 52.07 टक्के, कुलाबामध्ये 41.64 टक्के, मलबारमध्ये 50.08 टक्के, भायखळामध्ये 50.41 टक्के, शिवडीमध्ये 51.70 टक्के, तर माहीममध्ये 55.23 टक्के मतदान झाले आहे. तर, भांडूपमध्ये 60.18 टक्के मतदान झाले आहे. तसेच, अणुशक्ती नगर येथे 49.95 टक्के मतदान झाले आहे. तर, विक्रोळीमध्ये 53 आणि मुलुंडमध्ये 52.2 टक्के मतदान झाल्याचे समोर आले आहे.
दुपारी 03 वाजेपर्यंतचे मतदान?
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या माहितीनुसार, दुपारी 03 वाजेपर्यंत धारावीमध्ये 35.53 टक्के, सायनमध्ये 37.26, चेंबूरमध्ये 40.76 टक्के, अणुशक्तीमध्ये 38.62 टक्के, कुलाबामध्ये 33.44 टक्के, मलबारमध्ये 42.55 टक्के, भायखळामध्ये 40.27 टक्के, शिवडीमध्ये 41.76 टक्के, तर माहीममध्ये 45.56 टक्के मतदान झाले आहे. तर, भांडूपमध्ये 48.42 टक्के मतदान झाले आहे.
दुपारी 01 वाजेपर्यंतचे मतदान?
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या अंदाजित टक्केवारीनुसार दुपारी 01 वाजेपर्यंत, धारावीमध्ये 24.65 टक्के, सायन कोळीवाडामध्ये 19.49 टक्के, वडाळा विधानसभेत 31.32 टक्के, माहिम विधानसभेत 33.01 टक्के, वरळी विधानसभेत 26.96 टक्के, शिवडी विधानसभेत 30.05 टक्के, भायखळा मध्ये 29.49 टक्के, मुंबादेवी विधानसभेत 27.01 टक्के आणि कुलाबा विधानसभेत 24.16 टक्के मतदान झाले आहे. त्याशिवाय मुंबई उपनगरातील भांडूप विधानसभेत दुपारी 01 वाजेपर्यंत सर्वाधिक 38.75 टक्के मतदान झाले आहे.
सकाळी 11 वाजेपर्यंतचे मतदान?
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या अंदाजित टक्केवारीनुसार, धारावीमध्ये 13.278 टक्के, सायन कोळीवाडामध्ये 12.82 टक्के, वडाळा विधानसभेत 17.33 टक्के, माहिम विधानसभेत 19.66 टक्के, वरळी विधानसभेत 14.59 टक्के, शिवडी विधानसभेत 16.49 टक्के, भायखळा मध्ये 16.98 टक्के, मलबार हिल विधानसभेत 19.77 टक्के, मुंबादेवी विधानसभेत 14.95 टक्के आणि कुलाबा विधानसभेत 13.03 टक्के मतदान झाले आहे. त्याशिवाय मुंबई उपनगरातील भांडूप विधानसभेत सकाळी 11 वाजेपर्यंत सर्वाधिक 23.42 टक्के मतदान झाले आहे. तसेच, ठाकरे गटाचे प्रमुख असलेल्या उद्धव ठाकरे हे वास्तव्यास असलेल्या वांद्रे पूर्व विधासभेत सर्वाधिक कमी म्हणजे 13.98 टक्के मतदान झाले आहे.