Maharashtra Assembly Election 2024
घरमुंबईMaharashtra Election 2024 : ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, टक्केवारी वाढविण्याचा...

Maharashtra Election 2024 : ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, टक्केवारी वाढविण्याचा प्रयत्न

Subscribe

निवडणूक आयोगाने या विधानसभा निवडणुकीत दिव्यांग व्यक्तींसाठी 'मॉडेल मतदान केंद्र' उपक्रमाच्या अंतर्गत खास दिव्यांग संचालित आठ मतदान केंद्रांची उभारणी केली आहे. तसेच, 85 वर्षांवरील एक लाख 46 हजार 859 मतदारांसाठी गृहमतदान ही संकल्पना राबविण्यात आली आहे.

(Maharashtra Election 2024) मुंबई : लोकसभा निवडणुकीत मतदान केंद्रांवर झालेली गर्दी आणि गैरसोय आदी कारणांमुळे मतदानाच्या टक्क्यावर परिणाम झाला होता. तो लक्षात घेता, आता विधानसभा निवडणुकीत सर्व त्रुटी दूर करत मतदानाची टक्केवारी वाढविण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. निवडणूक आयोग तसेच महापालिका प्रशासनाने ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती आणि सर्वसामान्य मतदार यांच्यासाठी विशेष सुविधा उपलब्ध केल्या आहेत. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग मतदारांकडून त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. (Special facilities for senior citizens and disabled to increase voting percentage)

मुंबई शहर भागात 6 हजार 387 तर उपनगरात 17 हजार 540 असे एकूण 23 हजार 927 दिव्यांग मतदार आहेत. निवडणूक आयोग आणि मुंबई महापालिकेचे आयुक्त तथा जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांच्या आदेशाने दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना मतदान करणे सुलभ तसेच सोयीचे व्हावे यासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – Maharashtra polls 2024 : निवडणुकांचे इतके व्यापारीकरण कधीच झाले नव्हते, ठाकरे गटाचा भाजपावर निशाणा

ज्येष्ठ नागरिक तसेच दिव्यांग मतदार यांना मतदान केंद्रावर ने-आण करण्यासाठी व्हीलचेअर, व्हीलचेअर व्हॅन, दिव्यांग सुलभ बसेस, ईको व्हॅन, टॅक्सी, मतदानाच्या ठिकाणी जिन्यावर सरकत्या ‘व्हीलचेअर’ची (स्टेअर क्लायबिंग व्हीलचेअर) आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

‘No voters to be left behind’ या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या घोषणेनुसार मतदानाच्या दिवशी दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक मतदारांसाठी मुंबई शहर जिल्हा प्रशासनातर्फे विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या सुविधांचा लाभ घेत शिवडी विधानसभा मतदारसंघात मतदानासाठी दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक यांना वाहनांद्वारे मतदान केंद्रात नेण्यात आले आणि मतदान केल्यानंतर त्यांना पुन्हा घरापर्यंत सोडण्यात आले. त्यामुळे मतदान करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी तसेच दिव्यांग मतदारांनी यावेळी त्यांच्यासाठी करण्यात आलेल्या सेवासुविधा याबाबत समाधान व्यक्त केले.

निवडणूक आयोगाने या विधानसभा निवडणुकीत दिव्यांग व्यक्तींसाठी ‘मॉडेल मतदान केंद्र’ उपक्रमाच्या अंतर्गत खास दिव्यांग संचालित आठ मतदान केंद्रांची उभारणी केली आहे. तसेच, 85 वर्षांवरील एक लाख 46 हजार 859 मतदारांसाठी गृहमतदान ही संकल्पना राबविण्यात आली आहे. त्यामुळे यावेळी मतदानाची टक्केवारी नक्कीच वाढेल, असा विश्वास मुंबई महापालिकेचे आयुक्त तथा जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा – Maharashtra Election 2024 : सिंधुदुर्गातील तीन मतदारसंघांत 17 उमेदवार; 6,78,928 मतदारांचा कौल महत्त्वाचा


Edited by Manoj S. Joshi

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -