मुबंई : राज्याच्या 288 विधानसभा मतदारसंघांसाठी बुधवारी (ता. 20 नोव्हेंबर) मतदान पार पडले. त्यानंतर आता शनिवारी (ता. 23 नोव्हेंबर) मतमोजणी होणार आहे. त्यामुळे राज्यात नेमकी कोणाची सत्ता येणार? हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. मुंबईतही 36 विधानसभा मतदारसंघांमध्ये सुरळीत मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर आता मुंबईतील 33 केंद्रांवर मतमोजणी करण्यात येणार आहे. सकाळी 08 वाजता मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर आधी पोस्टल मतांची मोजणी होईल, त्यानंतर मुख्य मतमोजणीला सुरुवात होईल. (Maharashtra Election 2024 Where will vote counting be held in Mumbai?)
मुंबईतील मतमोजणीची केंद्र…
- वांद्रे पश्चिम : आर. व्ही. टेक्निकल हायस्कूल, खार (प.)
- भांडूप : सेंट झेवियर्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज, एल.बी.एस.रोड, कांजूरमार्ग (प.)
- वडाळा : महानगरपालिका न्यू बिल्डिंग, भगवान वाल्मीकी चौक, हनुमान मंदिराजवळ, विद्यालंकार मार्ग, अँटॉप हिल.
- शिवडी : एन. एम. जोशी रोड म्युनिसिपल प्रायमरी मराठी शाळा, एन. एम. जोशी मार्ग, करीरोड (प.).
- अंधेरी पूर्व : गावदेवी महापालिका शाळा, मथुरादास रोड, अंधेरी (पू.).
- वरळी : महालक्ष्मी स्पोर्ट्स ग्राउंड हॉल, वेस्टर्न रेल्वे स्पोर्ट्स असोसिएशन, फिनिक्स मॉलसमोर, सेनापती बापट मार्ग, महालक्ष्मी.
- मलबार हिल : विल्सन कॉलेज हॉल, नेताजी सुभाषचंद्र मार्ग, चर्नीरोड.
- चांदिवली : आयटीआय, किरोळरोड, विद्याविहार (प.)
- कलिना : मल्टी पर्पज हॉल, मुंबई विद्यापीठ, कलिना कॅम्पस, सांताक्रूझ (पू.)
- चेंबूर : आरसीएफ स्पोर्ट्स क्लब, बॅडमिंटन हॉल, आरसीएफ कॉलनी, आर.सी. मार्ग, चेंबूर.
- भायखळा : रिचर्डसन क्रुडास कंपनी लिमिटेड, सर जे. जे. रोडजवळ, भायखळा.
- मुलुंड : मुंबई पब्लिक स्कूल, मिठागररोड, मुलुंड (पू.).
- मागाठाणे : कँटिन हॉल, सीटीआयआरसी अभिनवनगर, राष्ट्रीय उद्यानाजवळ, बोरीवली (पू.).
- अंधेरी पश्चिम : एसएनडीटी महिला विद्यापीठ जुहू रोड, सांताक्रूझ (प.).
- कांदिवली पूर्व : पालिका सोशल वेल्फेअर सेंटर, ठाकूर कॉम्प्लेक्स, कांदिवली (पू.).
- जोगेश्वरी पूर्व : बॅटमिंटन हॉल, न्यू जिमखाना बिल्डिंग, इस्माईल युसुफ कॉलेज कम्पाउंड, जोगेश्वरी (पू.).
- कुर्ला : शिवसृष्टी कामराजनगर महापालिका शाळा, कुर्ला (पू.).
- कुलाबा : सर जे. जे. आर्ट स्कूल कॅम्पस, सीएसएमटी स्टेशन, फोर्ट.
- घाटकोपर पूर्व : मुंबई पब्लिक स्कूल, पंतनगर नं. 3 कॉम्प्लेक्स, घाटकोपर (पू.).
- मानखुर्द : शिवाजीनगर – म्युनिसिपल मॅटर्निटी हॉस्पिटल, लल्लुभाई कम्पाउंड, मानखुर्द.
- बोरीवली : 13/सी एफसीआय गोडाऊन, बोरिवली (पू.).
- गोरेगाव : उन्नतनगर मुंबई पब्लिक स्कूल उन्नतनगर 2, गोरेगाव (प.)
- दहिसर : रुस्तुमजी बिझनेस कॉम्पलेक्स महानगरपालिका मंडई. बिल्डिंग, दहिसर (प.).
- वांद्रे पूर्व : ग्रीन टेक्नॉलॉजी बिल्डींग, मुंबई विद्यापीठ, कलिना.
- धारावी : भारतरत्न राजीव गांधी जिल्हा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, धारावी बस डेपो रोड, धारावी.
- चारकोप : बजाज म्युनिसिपल स्कूल, बजाज रोड, कांदिवली (प.)
- मालाड पश्चिम : टाऊनशिप म्युनिसिपल हिंदी सीबीएससी इंग्लिश मालवणी मार्वे रोड.
- माहीम : इमराल्ड हॉल, डॉ. अँथोनिया डी. सिल्वा माध्यमिक शाळा, राव बहादूर एस. के. बोले रोड, दादर (प.).
- सायन कोळीवाडा : न्यू सायन म्युनिसिपल स्कूल, सायन (पूर्व) लायन्स तारा चंदबाप्पा हॉस्पिटलजवळ.
- मुंबादेवी : गिल्डरलेन महानगरपालिका शाळा, गिल्डर लेन, मुंबई सेंट्रल स्टेशन.
- दिंडोशी : मुंबई पब्लिक स्कूल, कुरार व्हिलेज, मालाड (पू.)
- वर्सोवा : शहाजीराजे भोसले स्पोर्टस कॉम्पलेक्स, आझादनगर, अंधेरी (प.)
- विक्रोळी : एम. के. ट्रस्ट सेकंडरी स्कूल मुख्य इमारत, कन्नमवारनगर, विक्रोळी (पू.)