मुंबई : मुंबईत विधानसभेच्या 36 जागांसाठी पार पडलेल्या निवडणुकीत आपले नशीब आजमावणाऱ्या माजी नगरसेवकांपैकी शिवसेनेचे (उबाठा) अनंत नर ( जोगेश्वरी) व मनोज जामसुतकर (भायखळा) आणि मूळ भाजपाचे माजी नगरसेवक मूरजी पटेल (उमेदवार शिंदे गट) असे तिघेजण विजयी झाले आहेत. ते शपथविधीनंतर आता नवीन आमदार बनणार आहेत. मात्र विविध पक्षाचे तब्बल 15 माजी नगरसेवक हे पराभूत झाले आहेत. त्यांना अपेक्षित मतदान झाले नाही. त्यामुळे त्यांचा व्यक्तिगत पराभव झालाच त्यासोबत पक्षाचाही पराभव झाला आहे. (Maharashtra Election Results 2024 Only three former corporators became MLAs in Mumbai)
सर्व माजी नगरसेवकांपैकी श्रद्धा जाधव आणि आसिफ झकेरिया हे वगळता (यापूर्वीही पराभूत) बाकीच्या सर्व माजी नगरसेवकांना प्रथमच आमदार होण्याची संधी लाभली होती. मात्र मतदारांनी त्यांना सपशेल नाकारले आहे. या निवडणुकीत जवळजवळ 18 माजी नगरसेवकांनी विविध राजकीय पक्षांकडून निवडणूक लढवून आपले नशीब आजमावले होते. मात्र या 18 पैकी फक्त तीन माजी नगरसेवकांच्या गळ्यात जनता जनार्दन, मतदार राजाने विजयी माळ घातली आहे. त्यामुळे आता हे तिघेजण आमदार झाले आहेत. मात्र उर्वरित विविध राजकीय पक्षाच्या 15 माजी नगरसेवकांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. या निवडणुकीत त्यांना हार पत्करावी लागल्याने आणि निवडणूक खर्चापोटी मोठा आर्थिक फटकाही बसला आहे.
हेही वाचा… Maharashtra Election Result 2024 : मुंबईत महायुतीचा डंका, मविआला जोरदार धक्का
आज शनिवारी (ता. 23 नोव्हेंबर) लागलेल्या निकालामुळे आता फेब्रुवारी महिन्यात महापालिकेची निवडणूक लागल्यास या पराभूत माजी नगरसेवकांना निवडणूक लढविताना आर्थिक चणचण भासण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यांना त्यांचे पक्ष पुन्हा नगरसेवक पदाची निवडणूक लढविण्यासाठी उमेदवारी देतील की नाही ? याबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतो. मुंबई महापालिकेची पाच वर्षांची मुदत संपून आज अडीच वर्षे झाली आहेत. मात्र अद्यापही महापालिकेची निवडणूक लागलेली नाही. मात्र, आता लोकसभा पाठोपाठ विधानसभा निवडणूक पार पडली आहे. या विधानसभा निवडणुकीत भाजपा महायुतीला बहुमत मिळाले आहे. तर महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला आहे.
विजयी झालेले तीन माजी नगरसेवक…
शिवसेना (ठाकरे गट)
(1) मनोज जामसुतकर – भायखळा
(2) अनंत नर – जोगेश्वरी पूर्व
मूळ भाजपा (उमेदवारी – शिंदे गट)
(1) मुरजी पटेल – अंधेरी पूर्व
पराभूत माजी नगरसेवकांची नावे, पक्ष व मतदारसंघ :
शिवसेना (ठाकरे गट) :
(1) श्रद्धा जाधव ( वडाळा)
(2) समीर देसाई (गोरेगाव)
(3) संजय भालेराव (घाटकोपर/पश्चिम)
(4) प्रवीणा मोरजकर (कुर्ला)
(5) राजू पेडणेकर ( मूळ उबाठा – अपक्ष) (वर्सोवा)
भाजपा :
(1) नाना आंबोले, अपक्ष- मूळ भाजपा (शिवडी)
(2)विनोद शेलार (मालाड)
मनसे :
(1) स्नेहल जाधव (वडाळा)
(2) संदीप देशपांडे (माहिम)
(3) भालचंद्र आंबुरे ( जोगेश्वरी)
शिवसेना (शिंदे गट) :
(1) सुवर्णा करंजे (विक्रोळी)
(2) सुरेश (बुलेट) पाटील (मानखुर्द)
राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार गट) :
(1) राखी जाधव (घाटकोपर/पूर्व)
काँग्रेस :
(1) आसिफ झकेरिया ( वांद्रे पश्चिम)
वंचित :
(1) महंमद सिराज शेख (मानखुर्द)