Friday, May 7, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Coroan Vaccination: मुंबईत १८ ते ४४ वयोगटासाठी १५ मे नंतर लसीकरण -...

Coroan Vaccination: मुंबईत १८ ते ४४ वयोगटासाठी १५ मे नंतर लसीकरण – महापौर

Related Story

- Advertisement -

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे कोरोना लसींपासून ते ऑक्सिजनपर्यंत अनेक सुविधा अपुऱ्या पडत आहेत. अनेक जण कोरोना लसीसाठी तासांतास रांगेत उभे राहत आहेत तर अनेक जण ऑक्सिजनसाठी वणवण फिरत आहेत. पण आता लसीचा साठा पुरेसा होत नसल्यामुळे अनेक केंद्र काही दिवसांसाठी बंद करावे लागत आहे. दरम्यान आता मुंबईत १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण १५ मेनंतर सुरू करण्याचा विचार असल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. त्यामुळे आता लस उपलब्ध नसल्या कारणाने १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण लांबणीवर पडणार असल्याची शक्यता आहे.

महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, लोकांनी थोडे समजून घ्यावे, तुमचे रजिस्ट्रेशन करा. १५ मेपर्यंत ४५ आणि ६० वर्षांवरील व्यक्तींचा लस देणार आहोत. दुसरा डोस घेणाऱ्यांना प्राधान्य देणार आहोत. त्यामुळे पहिल्या डोस घेणाऱ्या व्यक्तींनी थोडे थांबव. आपल्याला मेसेज येतो का? त्याची वाट पाहावी.

- Advertisement -

राज्यशासनाकडून १८ ते ४४ वयोगटातील लसीकरणाबाबतची तारीख जाहीर झाल्यानंतर याबाबतचे नियोजन करण्यात येईल. सद्यस्थितीत १५ मे २०२१ पर्यंत लसीकरणाचा दुसरा डोस घेणाऱ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यामुळे या संपूर्ण लसीकरण मोहिमेत मुंबईकर नागरिक सहकार्य करतील, असा विश्‍वास महापौरांनी व्यक्त केला आहे.

आज मुंबईत लसीकरण मोहीमे उशीरा सुरुवात झाली. पण आता मुंबईतील लसीकरणासाठी वॉक इन सिस्टम बंद होणार असून लसीचा साठा नसल्यामुळे पुढील ३ दिवस मुंबईत लसीकरण मोहीम बंद राहणार असल्याची माहिती मुंबई पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे.


- Advertisement -

हेही वाचा – होम आयसोलेटेड, सौम्य आणि लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी केंद्राची नवी गाईडलाईन जारी


 

- Advertisement -