घरमुंबईMaharashtra Gram Panchayat Election Results 2021: महाविकास आघाडीवर जनतेचा विश्वास- आदित्य ठाकरे

Maharashtra Gram Panchayat Election Results 2021: महाविकास आघाडीवर जनतेचा विश्वास- आदित्य ठाकरे

Subscribe

शहरांपासून गावांपर्यंत जनतेचा सरकारला जनाधार

राज्यात शुक्रवारी १५ जानेवारी रोजी घेण्यात आलेल्या ग्रामपंचायत निवडणुकींचा आज निकाल लागत आहे. राज्यातील १४ हजारांहून अधिक ग्रामपंचायतींचे निकाल लागत आहेत. सोमवार १८ जानेवीरी सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणी प्रक्रिया सुरु झाली आहे. पहिल्या टप्प्यात अनेक उमेदवारांचा विजय झाला आहे. राष्ट्रवादीने ग्रामीण भागात आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. तर शिवसेनेचाही ग्रामपंचायत निवडणुकीत वरचष्मा असल्याचे दिसत आहे. भाजपा आणि शिवसेनेत मोठी चुरसही पाहायला मिळाली आहे. तसेच ग्रामपंचायत निवडणूकीच्या निकालात महाविकास आघाडीला चांगले यश मिळत असल्याचे दिसत आहे. यावर राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

ग्रामपंचायत निवडणूकीच्या निकालावर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया देत म्हटले आहे की, ग्रामपंचायत निवडणूकीच्या आलेल्या निकालातून जनतेने पुन्हा एकदा महाविकास आघाडीवर विश्वास दाखवला असल्याचे सिद्ध झाले आहे. शहरातील आणि गावातील लोकांचा महाविकास आघाडीवर विश्वास कायम आहे. त्यामुळे जनतेचा विश्वास महाविकास आघाडीवरच आहे. असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही ग्रामपंचायत निवडणूक निकालावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. महाविकास आघाडीने ग्रामपंचायत निवडणूकीत चांगली कामगिरी केली असल्याचे मत व्यक्त केले आहे. तसेच जे सदस्य निवडून आलेत त्यांना विकास कामांसाठी सर्व प्रकारची मदत करु असे आश्वासन अजित पवार यांनी दिले आहे.

राज्यात ३४ जिल्ह्यातील सुमारे १४ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल आज संध्याकाळी ५ वाजेपर्यंत हाती येणार आहेत. तसेच निकालाची प्रतीक्षा राज्यातील जनतेला लागली आहे. भाजपानेही ग्रामपंचायत निवडणूकीत अनेक ठिकाणी विजय मिळवला असल्याचे दिसत आहे.

- Advertisement -

ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक ठिकाणी भाजपने जागा जिंकल्या आहेत. तसेच विदर्भ कोकणात भाजपला अभूतपूर्व यश मिळाले आहे. ग्रामपंचायत निवडणूकीदरम्यान महाविकास आघाडीवर जनतेचा रोष असल्याचे दिसले आहे. असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -