घरताज्या घडामोडीचाळीत दहा बाय दहाच्या खोलीत रहायचो, संडासची रांग अजुनही डोळ्यासमोरून जात नाही...

चाळीत दहा बाय दहाच्या खोलीत रहायचो, संडासची रांग अजुनही डोळ्यासमोरून जात नाही – जितेंद्र आव्हाड

Subscribe

संडासच्या बाहेर लागणारी रांग आपल्या आयुष्यातून कशी जाईल ? हा चाळकरांच्या मनातील यक्षप्रश्न

चाळीतील दुखण सर्वात काय असत हे कुणाला कळत असेल तर ते माझ्या माता भगिणींना कळत असेल. एवढ्याशा पगारात घर चालवायचे. घरातील अडीअडचणी सोडवायच्या. एकएका घरात दहा बारा माणस. तुमच्या खोल्या मोठ्या आहेत माझी खोली दहा बाय दहाची होती. मोरी, स्वयंपाक बनवायचा कट्टा. हे सगळ डोळ्यासमोरून जातं, पण एकच गोष्ट जात नाही ते म्हणजे त्या चाळीतील सार्वजनिक संडास. आपला चाळीतला अनुभव राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज बीडीडी चाळीच्या पुर्नविकास कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलून दाखवला. चाळीतील संडाच्या गैरसोयीबाबत बोलण्याचे धाडस कोणी दाखवणार नाही. संडासारख्या रोजच्या गोष्टीसाठी लावावी लागणारी रांग ही माझ्या आयुष्यातून कशी जाईल ? हा यक्ष प्रश्न प्रत्येक चाळकऱ्याच्या मनात असतो. त्या संडासाच्या बाहेर लागलेली लाईन आणि दररोजची गैरसोय हे सगळ खूपच फ्रस्ट्रेटिंग असायचे. त्याच्यातून बाहेर पडून आम्ही ठाण्याला गेलो. चाळीशी संबंधित असलेल्या आठवणी राज्याचे गृहमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी यानिमित्ताने सांगितल्या. बीडीडी चाळीच्या पुर्नविकासाच्या प्रकल्पाच्या कार्यक्रमाचे निमित्त आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी चाळ संस्कृतीत राहताना आपल्याला आलेला चांगला तसेच कटू अनुभव यानिमित्ताने मांडला.

माझी आजी लॅमिंग्टन रोडला केळी विकायची 

प्रत्येक चाळकरी माणसाची ही इच्छा असते की त्याच एक चांगल घर असावे. गावावरून येताना तो विचार करून येतो की मुंबईसारख्या शहरात माझ पोट कस भरेल. पोटाची सोय झाल्यावर तो छताची सोय बघतो. एकीकडे चाळीच्या संस्कृतीतील आठवणी ताज्या करतानाच दुसरीकडे छोट्याश्या घरात होणारी एकप्रकारची घुसमट आपल्या भाषणातून आज व्यक्त केली. चाळीतील हे सगळ जगण डोळ्यासमोरून जातं, पण एकच गोष्ट जात नाही ते म्हणजे चाळीतील संडासाला लावावी लागणारी रांग. या संडासाच्या रांगेच्या निमित्ताने ही गोष्ट आपल्या आयुष्यातून कशी जाईल यासाठीचा चाळकऱ्यांच्या मनातील प्रश्न त्यांनी बोलून दाखवला. विशेषतः महिला वर्गाला चाळीतील दुखण काय असेल ते कळत असेल असेही जितेंद्र आव्हाड याप्रसंगी बोलताना म्हणाले. वरळीत आलो की वेगवेगळ्या मिल, टिळक ब्रिजवरून गेलो की वेगवेगळ्या मिल. दादर सोडल की मोठमोठ्या उंचीच्या धुरकांड्यातून धूर सोडणाऱ्या मिल, भोंगे. माझी आजी लॅमिंग्टन रोडला केळी विकायची. केळी आणि कष्टकऱ्यांचे एक नाते होते. तेव्हा दहा पैशाला तीन केळी मिळायची. तीन केळी खाल्ली की पोट भरायच. पण आता सगळी मुंबईच बदलली आहे.

- Advertisement -

महिनोमहिने ठाण्यात मन रमले नाही

सध्या बदललेली मुंबई सगळीकडे पाहिल्यावर दिसते. आपण जर जांभोरी मैदानात चारही बाजुला नजर फिरवली आज श्रीमंतांचे इमले दिसतात. १९७० पर्यंत मी ताडदेवच्या श्रीपद भवन या चाळीत रहायचो. वडिल तळोजाला नोकरीला लागले. त्यांना नोकरीसाठी प्रवासाला अडीच तास लागायचे. त्यामुळे पहाटे साडेचार पाचला घर सोडायला लागायचे. आम्ही मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला आणि ठाण्याला गेलो. आमची ताडदेवमधली खोली १७ हजाराला विकली आणि ठाण्यात २७ हजाराला घर घेतले. पण पहिले तीन महिने मी तिथे रमलोच नाही. दुधाच्या केंद्रावर मिळणाऱ्या बाटल्यांच्या दुधाची सवय होती. ठाण्याला गेलो, तेव्हा ताजे दुध मिळायला लागले. त्या ताज्या दुधाला काहीतरी वास येतोय असे वाटायचे. त्यामुळे मी ते दुधच प्यायचो नाही. प्रत्येक शनिवार आणि रविवारी आई मला चाळीमध्ये घेऊन यायची आणि त्या चाळीमध्ये मी खेळायचो. आजही स्वयंपाक घर, मोरी सगळ डोळ्यासमोरून जात, पण एक गोष्ट जात नाही ती म्हणजे संडासासाठी लावावी लागणारी रांग. महिला वर्गाला हे दुखण अधिक कळते, त्यामुळे प्रत्येकाला ही गैरसोय आयुष्यात नको असते. या चाळवासीयांच्या निमित्ताने आज पवार साहेब म्हणाले की बीडीडी चाळवासीयांचे स्वप्न कधी पुर्ण होईल जितेंद्र ? त्यावेळी येत्या ३६ महिन्यात हे स्वप्न पुर्ण होणार आहे असेही आश्वासन दिले असल्याचे त्यांनी सांगितले.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -