घरमुंबईयंदा १२वीचा निकाल ८८.४१ टक्के

यंदा १२वीचा निकाल ८८.४१ टक्के

Subscribe

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल नुकताच ऑनलाइन जाहीर करण्यात आला. कोकण विभागाचा निकाल ९४.८५ टक्के लागला असून यंदाच्या वर्षीही कोकण विभाग राज्यातून अव्वल आला आहे. एकूण नऊ विभागांमध्ये नाशिकचा निकाल हा सर्वात कमी लागला असून राज्याचा एकूण निकाल ८८.४१ टक्के लागला आहे. आज दुपारी १ वाजता निकाल प्रसिद्ध करण्यात आला असून निकाल बघण्यासाठी विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्सुकतेने संकेतस्थळाला भेट दिली.

राज्याचा एकूण निकाल ८८.४१ टक्के

या परिक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागातील मंडळाकडून कला, वाणिज्य, विज्ञान आणि व्होकेशनल या शाखांतील एकूण १४ लाख १८ हजार ६४५ विद्यार्थ्यांनी परिक्षेसाठी नोंदणी केली होती. यापैकी १४ लाख १६ हजार ९८६ विद्यार्थांनी परीक्षा दिली. यापैकी १२ लाख ५२ हजार ८१७ विद्यार्थी उतीर्ण झाले असून ही निकालाची टक्केवारी ८८.४१ आहे.

- Advertisement -

यंदाही मुलींनी मारली बाजी

दरवर्षी प्रमाणे यावर्षीही मुलांपेक्षा मुलीचा निकाल जास्त लागला. परिक्षेला बसलेल्या विद्यार्थीनींचा निकाल ९२.३६ टक्के लागला तर विद्यार्थांचा निकाल ८५.२३ टक्के लागला. म्हणजेच विद्यार्थीनींच्या निकालाची टक्केवारी विद्यार्थ्यांपेक्षा ७.१३ टक्के जास्त आहे.

२२ हजार पुनर्परीक्षार्थ्यी यावर्षी उत्तीर्ण

नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखांमध्ये एकूण ६६ हजार ६२९ पुनर्परीक्षार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी ६६ हजार ४५६ परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यापैकी २२ हजार ७९२ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. यावरुन एकूण निकालाची टक्केवारी ३४.३० टक्के ठरली आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -