Thursday, April 15, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई महाराष्ट्राचे राजकारण हादरणार, दरेकर करणार गौप्यस्फोट

महाराष्ट्राचे राजकारण हादरणार, दरेकर करणार गौप्यस्फोट

संजय राठोड अजूनही वनमंत्रीच

Related Story

- Advertisement -

विधानपरिषदेच्या कामकाजाचा आज (बुधवार,३ मार्च) तीसरा दिवस आहे. विधानपरिषदेच्या कामकाजाला सुरुवात होण्यापूर्वीच विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मोठा खुलासा करणार असल्याचे वक्तव्य करत महाराष्ट्रातील राजकारणात मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचे म्हटले आहे. महाविकास आघाडीतील आणखी एका आमदाराचे बिंग फुटणार असल्याचे प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे. त्यामुळे अवघ्या महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या वक्तव्याकडे लागले आहे. विधानपरिषदेत आमदाराचा पर्दाफाश करुन सभागृहात काही पुरावे सादर करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी असे म्हटले आहे की, विधानपरिषदेत मोठा गौप्यस्फोट करुन महाविकास आघाडीतील आणखी एका आमदाराचा पर्दाफाश करणार आहे. एका आमदाराची डीएनए चाचणीची मागणी करणार असून गंभीर आरोपही लावणार असल्याचे विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे. आमदाराची कथित पत्नी आणि त्यांच्या मुलाने एफआयआर दाखल केला आहे. तसेच त्यांना मारण्याचा कट, फोटो आणि पेटीशन सभागृहात सादर करणार असल्याचेही विधानपरिषद प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.


- Advertisement -

हेही वाचा : अधिवेशनाच्या समारोपाला संजय राठोड पुन्हा मंत्रीमंडळात ? – प्रवीण दरेकर


 

संजय राठोड अजूनही वनमंत्रीच

- Advertisement -

पूजा प्रकरणात अडकल्याने राजीनामा देणारे वनमंत्री संजय राठोड अजूनही वनमंत्रीच आहेत. संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा दिला आहे. परंतु तो राजीनामा अजूनही मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांकडे दिला नाही त्यामुळे कायद्याने संजय राठोड अजूनही वनमंत्रीच आहेत. राज्यपालांनी राजीनामा स्विकारल्यावर त्यांच्या राजीनामा ग्राह्य धरला जाईल. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा फ्रेम करण्यासाठी स्विकारला नाही असे वक्तव्य काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत केले होते. परंतु मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला नाही मग आता समजेल आम्हाला अधिवेशनचे वातावरण निवळण्यासाठी राजीनामा घेतला की खरच राजीनामा घेतला आहे. असे विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.

- Advertisement -