घरमुंबईकोरोनाने सगळ्यांना बुडवले, पण तळीरामांनी राज्याला तारले !

कोरोनाने सगळ्यांना बुडवले, पण तळीरामांनी राज्याला तारले !

Subscribe

राज्याच्या तिजोरीत ९ हजार कोटींची भर

कोरोना काळात सर्वच उद्योग व्यवसायाला बंद असल्यामुळे राज्य सरकारचा महसूला मोठी तुट पडली होती. मात्र राज्यातील तळीरामने ही तुट भरुन काढण्यासाठी राज्य सरकारला मोठा हातभार लावलेला आहे. २०२० मध्ये तळीरामुळे  राज्याच्या तिजोरीत ९ हजार कोटीच्या भर पडली आहे.

दारु हा राज्याच्या उत्पन्नाच्या दुष्टीने महत्वाचा घटक राहिला आहे.मात्र कोरोना काळात राज्यातील बीयर बार, वॉईन शॉपी बंद असल्यामुळे राज्य सरकारचा मसूहलात मोठी तुट पडणार होती. त्यामुळे राज्य सरकारकडून मद्यविक्रीचे दुकांना काही प्रमाणात सुट देउुन सुरु करण्याचा प्रयत्न सुध्दा करण्यात आलेल्या होता. तसेच ऑनलाईन मद्यविक्रीला सुध्दा मान्यता दिली होती. त्यामुळे राज्य सरकारच्या या प्रयत्नाला यश आल्याचे दिसून येत आहे. त्याला मद्यप्रेमीनी मोठी साथ दिल्याचे निर्देशनात येत आहे.  राज्य उत्पादन शुल्क विभागाने   एप्रिल ते डिसेंबर 2019 या काळात  ११ हजार ३९० कोटी रुपयांचा महसूल गोळा केला होता. मात्र यावर्षी लॉकडाऊनमुळे उत्पादन शुल्क विभागाने ९ हजार ३०३ कोटी रुपयांचीच कमाई केली.गेल्या वर्षीच्यातूलने 2020 मध्ये महसूल ८२ टक्क्यांपर्यंत वाढला आहेत. उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दैनिक आपलं महानगरला सांगितले की, लॉकडाऊनमुळे मद्य विक्रीला मोठा फटका बसला होता. त्यामुळेच विक्री कमी झाल्याने महसुलात घट झाली होती. मात्र आता पुन्हा महसुलात वाढ होऊ लागली आहे.

अशी आहे आकडेवारी

राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध उत्पादन व अवैध मद्य विक्री प्रकरणात एप्रिल  ते नोव्हेंबर 2020 या कालावधीमध्ये राज्यात  २९,८५० गुन्हे नोंदविण्यात आले असून १७,६५४ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर गेल्या वर्षी याच काच कालावधीमध्ये ३० हजार ७३९ गुन्हे नोंदविण्यात आले होते. ज्यात 22 हजार 118 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -

बनावट मद्याची तस्करी वाढली 

कोरोना काळात बनावट मद्याच्या तस्करी विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे. गेल्या वर्षी पेक्षा जास्त यंदा बनावट मद्याची तस्करीचे प्रकरण समोर आले आहे. गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात प्रशासनाने बनावट मद्याची तस्करी करताना राज्यभरात ४ हजार २६६ गुन्हे दाखल केले होते. या कारवाईत ३ हजार २४१ आरोपींना अटक केली होती. याउलट यावर्षी लॉकडाऊन असतानाही बनावट मद्य प्रकरणी ४ हजर १६६ प्रकरणांत गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच बनावट मद्य प्रकरणी ३ हजार ८० आरोपींना अटक झाली आहेत.

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -