मुंबई – महायुती सरकारचे रखडलेले खाते वाटप अखेर हिवाळी अधिवेशनानंतर जाहीर झाले आहे. महायुती सरकारचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी 5 डिसेंबरला मुंबईतील आझाद मैदान येथे शाही सोहळ्यात शपथ ग्रहण केली होती. त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार केव्हा होणार, याची चर्चा बरेच दिवस सुरु होती. हिवाळी अधिवेशन सुरु होण्याच्या एक दिवस आधी अर्थात 15 डिसेंबरला मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार झाला. 39 मंत्र्यांचा नागपूर विधान भवन येथे शपथविधी झाला. त्यानंतर बिन खात्याच्या मंत्र्यासह हिवाळी अधिवेशन पार पडले. त्यानंतर खाते वाटप जाहीर झाले आहे.
गृह विभाग, अर्थ खाते आणि गृहनिर्माण खाते कोणाकडे राहणार यावरुन महायुतीमध्ये पेच निर्माण झाला होता. तीन पक्षांचे हे सरकार असल्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीनंतर मंत्रिमंडळ विस्ताराला दहा दिवस लागले. त्यानंतर खाते वाटपाला सहा दिवस गेले. अखेर गृह खाते भाजपने स्वतःकडे ठेवले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह खाते गेले आहे. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नगरविकास आणि गृहनिर्माण खाते देण्यात आले आहे. अजित पवार यांना पुन्हा एकदा अर्थ खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
खाते वाटप –
देवेंद्र फडणवीस – गृह आणि उर्जा, माहिती आणि जनसंपर्क
एकनाथ शिंदे – नगर विकास, गृह निर्माण
अजित पवार – अर्थ, नियोजन आणि राज्य उत्पादन शुल्क
चंद्रशेखर बावनकुळे – महसूल
राधाकृष्ण विखे पाटील – जलसंपदा (गोदावरी आणि कृष्णा खोरे विकास )
हसन मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण
चंद्रकांत पाटील – उच्च व तंत्र शिक्षण आणि संसदीय कार्यमंत्री
गिरीश महाजन – जलसंपदा (विदर्भ, तापी, कोकण विकास) आणि आपत्ती व्यवस्थापन
गणेश नाईक – वन मंत्री
गुलाबराव पाटील – पाणी पुरवठा आणि स्वच्छता
दाद भुसे – शालेय शिक्षण
संजय राठोड – माती व पाणी परीक्षण
पंकजा मुंडे – पर्यावरण आणि क्लायमेट चेंज, पशूसंवर्धन
उदय सामंत – उद्योग आणि मराठी भाषा
धनंजय मुंडे – अन्न व नागरी पुरवठा
मंगल प्रभात लोढा – कौशल्य विकास
जयकुमार रावल – विपणन, राजशिष्टाचार
अतुल सावे – ओबीसी कल्याण, दुग्धविकास
अशोक उईके – आदिवासी विकास
शंभूराज देसाई – पर्यटन आणि खनीकर्म, माजी सैनिक कल्याण
आशिष शेलार – माहिती तंत्रज्ञान, सांस्कृतिक
दत्तात्रय भरणे – क्रीडा, अल्पसंख्याक आणि वक्फ बोर्ड
आदिती तटकरे – महिला आणि बालकल्याण
शिवेंद्र सिंह भोसले – सार्वजनिक बांधकाम
माणिकराव कोकाटे – कृषी
जयकुमार गोरे – ग्रामीण विकास आणि पंचायत राज
नरहरी झिरवाळ – अन्न व औषध प्रशासन
संजय सावकारे – वस्त्रोद्योग
संजय शिरसाट – सामाजिक न्याय
प्रताप सरनाईक – परिवहन
भरतशेठ गोगावले – रोजगार हमी योजना
मकरंद पाटील – मदत आणि पुनर्वसन
नितेश राणे – मत्स्य आणि बंदरे
आकाश फुंडकर – कामगार
बाबासाहेब पाटील – सहकार
प्रकाश आबिटकर – सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण
राज्यमंत्री
आशिष जैस्वाल – अर्थ आणि नियोजन, कृषी, मदत आणि पुनर्वसन, कायदा आणि कामगार
माधुरी मिसाळ – शहरी विकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण आणि अल्पसंख्याक
पंकज भोयार – गृह (ग्रामीण), शालेय शिक्षण, सहकार, खनीकर्म
मेघना बोर्डीकर – सार्वजनिक आरोग्य,
Edited by – Unmesh Khandale