Wednesday, March 3, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी अल्लाह को पता था कोरोना आनेवाला है, इसलिए कब्रस्तान बना..जितेंद्र आव्हाडांचे वादग्रस्त...

अल्लाह को पता था कोरोना आनेवाला है, इसलिए कब्रस्तान बना..जितेंद्र आव्हाडांचे वादग्रस्त विधान

अल्लाह को पता था कोरोना आनेवाला है, इसलिए कब्रस्तान बना, असं वादग्रस्त विधान राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.

Related Story

- Advertisement -

अल्लाह को पता था कोरोना आनेवाला है, इसलिए कब्रस्तान बना, असं वादग्रस्त विधान राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. मु्ंब्रा येथील एका नगरसेविकेच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्धाटन कार्यक्रमात ते बोलत होते. आव्हाडांच्या या विधानावरून विरोधकांनी त्यांना लक्ष्य केलं असून कोरोना काळातील अपयश लपवण्यासाठीच आव्हाडांनी अल्लाचा आधार घेतल्याची टीका केली आहे.

दरम्यान, या उद्घाटन सोहळ्यात आव्हाड यांनी लोकांना सावध राहण्याचा सल्ला तर दिलाच पण अल्लाह को २०११ में मालूम था कोरोना आनेवाला है, तभी मुंब्रा में २०१९ साली कब्रस्तान बना असंही ते म्हणाले . आव्हाड मुंब्रा-कळवा विधानसभेचे आमदार आहेत. मात्र कोरोना काळात याच भागात कोरोनाचा संसर्ग वेगाने झाला होता. त्यावरून आव्हाड यांच्यावर विरोधकांनी टीकाही केली होती. हेच अपयश झाकण्यासाठी त्यांनी अल्लाचे नाव घेतल्याचा आरोप विरोधक करत आहेत. आव्हाड यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत असून मुस्लीम मतदारांना खुश करण्याचा आव्हाडांचा हा प्रयत्न असल्याच्या चर्चाही रंगू लागल्या आहेत.

- Advertisement -