घरCORONA UPDATELockdown- गरजूंच्या मदतीला 'ती'चा हात, चालवते मोफत ऑटोरिक्षा!

Lockdown- गरजूंच्या मदतीला ‘ती’चा हात, चालवते मोफत ऑटोरिक्षा!

Subscribe

मुंबईसह देशभरात कोरोनाला आळा घालण्यासाठी ३ मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे देशात वाहतूक सध्या बंद आहे. केवळ अत्यावश्यक सेवेसाठी काही प्रमाणात बसची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांचे मात्र हात आहेत. लॉकडाऊनमुळे सगळे सध्या घरीच बसून आहेत. पण एखादी इमरजन्सी आली तर त्यासाठी प्रवासाठी साधन मिळत नाहीये. पण मुंबईची एक महिला ऑटोरिक्षा चालक गरजू लोकांना मोफत आपली ऑटोरिक्षा उपलब्ध करून देत आहे.

लॉकडाऊनच्या काळात गरिबांना येण्या-जाण्यासाठी शीतल आपल्या रिक्षाचे वापर करते. पण ती यावेळी एकही रूपया त्यांच्याकडून घेत नाही. या विषयी बोलताना शीतल म्हणाली, लॉकडाऊनच्या आधी मी आपलं कुटुंब चालवण्यासाठी रिक्षा चालवत होते. मात्र आता लोकांसाठी मोफत रिक्षा चालवत आहे. लॉकडाऊनमुळे मी लोकांकडून पैसे न घेण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

कामाचं समाधान मिळतं

शीतल दिवसबर मुंबईच्या रस्त्यावर रिक्षा चालवते. कोणत्याही वेळी गरजूंना तीची गरज भासली की ती लगेचच त्यांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहचवते.


हे ही वाचा – शोपियांमध्ये चकमक सुरू; चार दहशतवादी ठार!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -