घर मुंबई Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; शिवसेना भवनातील टीम शिंदेंच्या गळाला

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; शिवसेना भवनातील टीम शिंदेंच्या गळाला

Subscribe

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांना सोबत घेत शिवसेनेतून बंडखोरी केली. पुढील काही दिवसात या बंडखोरीला वर्ष होईल. वर्ष पूर्ण व्हायच्या आधीच शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदेंनी मिळवले. याशिवाय राज्यभरातून ठाकरे गटाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि महत्त्वाचे नेते शिंदे गटात प्रवेश करत आहेत. त्यामुळे अस्तित्त्वाची लढाई लढत असलेल्या उद्धव ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. शिवसेना भवनातील टीमने शिंदे गटात प्रवेश केला आहे.

ठाकरे गटाच्या सभा, कार्यक्रम आणि सोशल मीडियावरील प्रचाराची धुरा सांभाळणाऱ्या शिवसेना भवनातील कर्मचाऱ्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत शिंदे गटात प्रवेश केला आहे. चांदिवली येथील एका जाहीर कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपास्थितीत या कर्मचाऱ्यांनी प्रवेश केला. ठाकरे कुटुंबीयांचे निकटवर्तीय आणि सचिव अनिल देसाई यांचा विश्वासू असलेला कट्टर शिवसैनिक अशी ओळख असलेल्या अमोल मटकर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. अमोल मटकर यांच्यासोबत अमित शिगवण, अविनाश मालप, प्रथमेश चाचले यांनीही शिंदे गटात प्रवेश केला आहे. (Maharashtra Politics : Big blow to Uddhav Thackeray; social media Team Shinde in Shiv Sena Bhavan in marathi)

- Advertisement -

शिवसेनेच्या कार्यक्रमांमध्ये अत्यंत महत्वाची भूमिका बजावणारा कार्यकर्ता
शिवसेनेचे इव्हेंट्स, सोशल मीडिया आणि डिझायनिंग टीममध्ये अत्यंत महत्वाची भूमिका बजावणारा कार्यकर्ता म्हणून अमोल मटकर  यांनी पक्षात ओळख होती. दरवर्षी दसरा मेळावा, शिवसेना पक्षाचा किंवा मार्मिकचा वर्धापन दिन या कार्यक्रमांच्या आयोजनांसह मंचावरच्या बॅकड्रॉप पासून संपूर्ण कार्यक्रमाची जबाबदारी अमोल मटकर यांच्यावर असायची. याशिवाय पक्षाचे पोस्टर्स, बॅनर्स, सोशल मीडियावरील मिम्स, कार्ड्स, फोटोज आणि व्हिडिओजच्या डिझायनिंगच्या कामात ते महत्वाची भूमिका बजावत होते.

अमोल मटकर यांचे ‘होय, करून दाखवलं !’ हे गाजलेले स्लोगन
‘होय, करून दाखवलं !’ हे अमोल मटकर यांचे 2012 च्या मुंबई महानगर पालिका निवडणुकीमधील गाजलेले स्लोगन. या कॅम्पेनमध्ये अमोल यांचा महत्वाचा सहभाग होता. याचबरोबर सेना-भाजपा युती सरकार असताना परिवहन खात्याचे मंत्री दिवाकर रावते यांच्या नेतृत्वात सर्व नव्या शिवशाही एसटी बसेसवरचे लोगोसुद्धा अमोल यांनीच डिझाईन केले होते. यावर्षीच्या ‘स्वातंत्राचा अमृत महोत्सवा’चा मराठी लोगोसुद्धा अम्ब्रेला डिझाइन्स यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आला होता. अमोल मटकर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे ठाकरे गटातील एक महत्वाचा कार्यकर्ता गमावल्याची सध्या चर्चा सुरू आहे. त्यामुळे या धक्क्यातून सावरण्यासाठी ठाकरे गट कोणती पावले उचलणार हे पाहावे लागेल.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -