घरCORONA UPDATELockDown: वाधवानप्रकरणी अमिताभ गुप्ता सक्तीच्या रजेवर; गृहमंत्र्यांचे आदेश

LockDown: वाधवानप्रकरणी अमिताभ गुप्ता सक्तीच्या रजेवर; गृहमंत्र्यांचे आदेश

Subscribe

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विशेष गृह सचिव अमिताभ गुप्ता यांना वाधवान प्रकरणी चौकशी पूर्ण होईपर्यंत सक्तीच्या रजेवर पाठवले आहे.

येस बँक आणि डीएचएफएल घोटाळ्यातील वाधवान बंधू यांनी संचारबंदी असतानाही खंडाळा ते महाबळेश्वर प्रवास केल्याची धक्कादायक माहितील समोर आली असून यासाठी विशेष गृह सचिव अमिताभ गुप्ता यांच्या पत्राद्वारे त्यांना परवानगी मिळाल्याचे समजते. ही बाब उघड झाल्यानंतर सरकारवर विरोधकांनी चहू बाजूंनी प्रश्नांचा भडिमार केला. अखेर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विशेष गृह सचिव अमिताभ गुप्ता यांना वाधवान प्रकरणी चौकशी पूर्ण होईपर्यंत सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. अनिल देशमुख यांनी रात्री दोन वाजत या संदर्भात ट्विटरवरून माहिती दिली.

- Advertisement -

काय आहे प्रकरण

देशासह राज्यात लॉकडाऊन असताना वाधवान कुटुंबियांसह तब्बल २३ जणांनी ५ गाड्यांमधून खंडाळा ते महाबळेश्वर प्रवास केल्याची खळबळजनक माहिती समोर आली. हा प्रवास त्यांनी गृहमंत्रालयातील विशेष गृह सचिव अमिताभ गुप्ता यांच्या पत्रावर केल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे संचारबंदीच्या काळात वाधवान कुटुंबिय प्रवास कसे करू शकतात, या मुद्द्यावर विरोधकांनी गृहखात्यावर चांगलेच धारेवर धरले. महाबळेश्वरमधील स्थानिकांनी केलेल्या तक्रारीमुळे हा प्रकार उघड झाला असून त्यामध्ये या सर्व २३ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील वाधवान बंधू डीएचएफएल घोटाळ्याप्रकरणी काही दिवसांपूर्वीच जामिनावर सुटले आहेत.

वाधवान कुटुंबाच्या प्रवासाबाबत चौकशी करून कारवाई केली जाईल – गृहमंत्री अनिल देशमुख

वाधवान कुटुंबाच्या प्रवासाबाबत चौकशी करून कारवाई केली जाईल – गृहमंत्री अनिल देशमुख

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಗುರುವಾರ, ಏಪ್ರಿಲ್ 9, 2020

- Advertisement -

विरोधकांनी सरकारला धारेवर धरले 

विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री चंद्रकांत पाटील, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर सरकारच्या धोरणावर सडकून टीका केली. गरिबाला एक न्याय आणि श्रीमंतांना दुसरा, असं या सरकारच्या राज्यात आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यामध्ये श्रीमंत धनाढ्यांना लॉकडाऊन नाही का? पोलिसांच्या परवानगीने हे थेट महाबळेश्वरमध्ये सुट्टी एन्जॉय करू शकतात. कुणाच्या आदेशाने किंवा मेहेरबानीने अशी परवानगी देण्यात आली? मुख्यमंत्री महोदय आणि गृहमंत्री महोदय, तुम्ही आम्हाला याचं उत्तर देणं लागता’. तर गृहमंत्र्यांची सखोल चौकशी करून त्यांचा त्वरीत राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घ्यावा, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली.

हेही वाचा –

Coronavirus: ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन आयसीयूमधून बाहेर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -