घरमुंबईपरवानगी मिळाली; मुंबईत थर्टी फर्स्टला रात्रभर पार्टी!

परवानगी मिळाली; मुंबईत थर्टी फर्स्टला रात्रभर पार्टी!

Subscribe

मुंबईत रात्रभर नववर्षाच्या स्वागताचं सेलिब्रेशन करायला राज्य सरकारने परवानगी दिली आहे. त्यासाठी मुंबई पोलिसांनी देखील कंबर कसली आहे.

मुंबईत नाइट लाइफबद्दल आग्रही असणारे शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी नुकतीच मुख्यमंत्र्यांकडे ३१ डिसेंबरला रात्रभर सेलिब्रेशनला परवानगी देण्याची मागणी केली होती. तसेच, मुंबईकरांमध्ये दरवर्षी अशा सेलिब्रेशनची क्रेझ दिसून येते. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ३१ डिसेंबरला रात्रभर सेलिब्रेशन करण्यासाठी परवानगी दिली आहे. रात्रभर मुंबईतले पब, बार, हॉटेल सुरू राहाणार आहेत. त्यामुळे आता थर्टी फर्स्टचं प्लॅनिंग करणाऱ्यांसाठी मुंबईत रात्रभर जाम छलकणार आहे! मात्र, या निर्णयामुळे मुंबई पोलिसांचं काम किंवा जबाबदारी वाढली आहे. त्यामुळे त्यांनी देखील कंबर कसून सुरक्षेची तयारी सुरू केली आहे.

- Advertisement -

थर्टी फर्स्टसाठी मोठा पोलीस फौजफाटा

थर्टी फर्स्टच्या आऊटडोअर सेलिब्रेशनची प्रामुख्याने तरुणांमध्ये क्रेझ दिसून येते. मुंबईत मोठ्या प्रमाणावर थर्टी फर्स्टच्या पार्ट्यांचे आयोजन केले जाते. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने रात्रभर पार्टी सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातले विशेष आदेश देण्यात आले आहेत. यामुळे मुंबई पोलिसांनी सुमारे ४० हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी तैनात केला आहे. मुंबई पोलिसांचे डीसीपी मंजुनाथ सिंगे यांनी ही माहिती दिली आहे.

- Advertisement -

मुंबईच्या रस्त्यांवर असेल सीसीटीव्हीची नजर

थर्टी फर्स्टच्या पार्टीसाठी ४० हजार पोलिसांचा तगडा पहारा मुंबईच्या रस्त्यांवर असणार असून त्यामध्ये गणवेशधारी पोलिसांसोबतच साध्या वेशातल्या पोलिसांचा देखील समावेश असणार आहे. प्रामुख्याने महिला, तरुणींच्या सुरक्षेवर सुरक्षा पथकं लक्ष ठेऊन असणार आहेत. याशिवाय सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने देखील मुंबईच्या रस्त्यांवर बारीक लक्ष ठेवलं जाणार असल्याचं मंजुनाथ सिंगे यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे मुंबईकर जेव्हा रात्रभर जागून नव्या वर्षाचं स्वागत करत असतील, तेव्हा मुंबईकरच असलेले पोलीस मात्र डोळ्यात तेल घालून मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी खडा पाहारा देत असणार आहेत.


हेही वाचा – थर्टीफर्स्ट नाईट; पोलीस बंदोबस्त टाईट!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -