Maharashtra Assembly Election 2024
घरमुंबई Vidhan Sabha Election 2024 : मुंबईत सागर बंगला भाजपच्या घडामोडींचे केंद्र; बाळा...

 Vidhan Sabha Election 2024 : मुंबईत सागर बंगला भाजपच्या घडामोडींचे केंद्र; बाळा नांदगावकर फडणवीसांच्या भेटीला 

Subscribe

मुंबई – राज्याच्या विधानसभेसाठी 20 नोव्हेंबरला मतदान झाले, उद्या मतमोजणी होणार आहे. मतदान झाल्यानंतर आलेल्या एक्झिट पोलनुसार महायुती, महाविकास आघाडी यांचे बहुमताचे सरकार येण्याची शक्यता आहे, त्यासोबतच तिसरा अंदाज व्यक्त केला जात आहे. राज्यात त्रिशंकू स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे आज सकाळपासून मुंबईत घडामोडींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सागर बंगला भाजपच्या घडामोडींचे केंद्र ठरला आहे. महायुतीला बहुमत मिळाले नाही तर भाजपचा दुसरा प्लॅन काय असेल, भाजप प्लॅन ‘बी’चीही तयारी करत आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निवडणुकीदरम्यानच स्पष्ट केले होते की राज्यात महायुतीची सत्ता येणार आणि मनसे सत्तेत सहभागी असेल. या पार्श्वभूमीवर मनसे नेते आणि शिवडीचे उमेदवार बाळा नांदगावकर यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत भाजपचे महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, पराग शाह, मिहिर कोटेचा, कालिदास कोळंबकर, गिरीश महाजन, मंगलप्रभात लोढा यांचा समावेश होता. भाजपची खलबतं देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी मोठ्या प्रमाणात घडत आहे. भाजपच्या बैठकीला मनसे नेते आणि उमेदवार बाळा नांदगावकर उपस्थित असल्याची माहिती आहे, यामुळे अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत.

- Advertisement -

भाजप – महायुतीला बहुमत मिळाले नाही तर छोटे पक्ष आणि अपक्षांची मदत घेऊन सत्ता स्थापन करण्याची भाजपची तयारी असणार आहे. बाळा नांदगावकर यांना भाजपने पाठिंबाही जाहीर केला होता. त्यामुळेही त्यांच्या उपस्थितीची अधिक चर्चा होत आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Election 2024 : भाजपकडून निवडणुकीच्या आधी मुस्लिम महिलांच्या बोटाला शाई; इम्तियाज जलील यांच्याकडून व्हिडिओ सादर

भाजप आणि मनसेमध्ये काय शिजतंय ?

मनसेने लोकसभेत भाजप – महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यामुळे मुंबईतील काही जागांवर भाजप आणि शिंदेंची शिवसेना मनसेला पाठिंबा देईल अशी चर्चा होती. मात्र राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांची माहिम मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर महायुतीने सदा सरवणकर या विद्यमान आमदाराला येथून तिकीट दिले. यामुळे मनसेमध्ये नाराजी होती. त्यानंतरही मनसे नेते आता निकालाआधीच भाजपच्या बैठकीत सामील झाले आहे. विशेष म्हणजे शिंदे सेनेचा एकही नेता या बैठकीला हजर नव्हता हे विशेष. त्यामुळे भाजप आणि मनसेमध्ये काय शिजतयं याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

Edited by – Unmesh Khandale

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -