Friday, June 9, 2023
27 C
Mumbai
घर मुंबई महारेराचा दणका : ११ विकासकांकडून ८ कोटींची वसुली

महारेराचा दणका : ११ विकासकांकडून ८ कोटींची वसुली

Subscribe

 

मुंबईः महारेराने कारवाईचा बडगा उगारत मुंबई आणि उपनगरातील ११ विकासकांकडून ८ कोटी ५७ लाख २६ हजार रुपयांची वसुली केली आहे. या वसुलीमुळे विकासकांना चांगलाच दणका बसला आहे.

- Advertisement -

महारेरा विकासकांवर जप्तीचा कार्यवाही करत आहे. या भीतीने विकासक नुकसान भरपाईची रक्कम भरत आहेत. ग्राहकांशी तडजोड करुन नुकसानभरपाई निकाली काढत आहेत. ग्राहकांना नुकसान भरपाईपोटी जारी केलेले वारंटस वसूल व्हावे, यासाठी महारेरा पाठपुरावा करत आहे. या पद्धतीने २० वारंटसच्या माध्यमातून मुंबई उपनगर, मुंबई शहर , रायगड आणि ठाणे जिल्ह्यातील ११ विकासकांनी ८ कोटी ५७ लाख २६ हजार ८४६ रुपये एवढी रक्कम जमा केलेली आहे.

मुंबई शहरातील मातोश्री प्रॉपर्टीज, श्री सदगुरू डिलक्स आणि फलक डेव्हलपर्सनी ३ नोटीस अनुक्रमे २२ लाख ५० हजार, १५ लाख ७५ हजार आणि ९ लाख ७० हजार ५५० असे एकूण ४७ लाख ९५ हजार ५५० जमा करण्यात आलेले आहेत.

- Advertisement -

ठाणे येथील रवी डेव्हलपर्स आणि नताशा डेव्हलपर्स या दोन विकासकांनी तडजोड करून प्रत्येकी एका नोटीशीपोटी अनुक्रमे १ कोटी १९ लाख ५८ हजार ७२८ आणि ७१ लाख रूपये जमा केलेले आहेत.

ज्यांनी रकमा जमा केल्यात किंवा ग्राहकांशी तडजोडी केल्या त्यात मुंबई उपनगरातील विधी रिअल्टर्स, स्कायस्टार बिडकाॅन, लोहितका प्रॉपर्टीज, व्हिजन डेव्हलपर्स आणि विजयकमल प्रॉपर्टीज अशा ५ विकासकांचा यात समावेश असून त्यांनी अनुक्रमे ४ कोटी १ लाख ९७ हजार, ५७ लाख ८४ हजार, १७ लाख ४० हजार, ३७ लाख , २५ लाख ६६ हजार १३७ अशी एकूण ५ कोटी ३९ लाख ८७ हजार १३७ एवढ्या रकमेचे दावे निकाली काढलेले आहेत. अशा एकूण ११ विकासकांनी २० वारंटसपोटी ८ कोटी ५७ लाख २६ हजार ८४६ रूपये जमा केलेले आहेत.

महारेराच्या कारवाईमुळे ग्राहकांना नाहक त्रास देणाऱ्या विकासकांना चांगलाच दणका बसला आहे.

- Advertisment -