घरमुंबईवैधानिक विकास महामंडळांवरून सत्ताधारी, विरोधकांमध्ये सामना

वैधानिक विकास महामंडळांवरून सत्ताधारी, विरोधकांमध्ये सामना

Subscribe

विरोधकांचा सभात्याग

राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात वैधानिक विकास महामंडळाच्या पुनर्स्थापनेच्या मुद्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी झाली. भाजप नेते माजी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अधिवेशनाचे कामकाज सुरू होताच मागास भागांच्या वैधानिक विकास महामंडळाच्या स्थापनेचा मुद्दा उपस्थित केला. वैधानिक विकास महामंडळाची पुनर्स्थापना का केली नाही? असा सवाल उपस्थित केला.

या मुद्यावर वित्तमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना उत्तर देताना राज्य सरकार या आर्थिक वर्षात वैधानिक विकास मंडळाची स्थापना करण्याच्या विचाराचे असून ते करणारच आहे असे सांगायचा प्रयत्न केला. मात्र, असे गृहित धरून सभागृहात कामकाज करता येत नाही, असे सांगत मुनगंटीवार आणि फडणवीस यांच्या नेतृत्वात विरोधकांनी सभात्याग केला.

- Advertisement -

१२ नावे जाहीर होतील त्यादिवशीच महाविकास आघाडीचे सरकार, वैधानिक विकास महामंडळ झालेच पाहिजे या मताचे आहे. याबाबत सरकारचे दुमत नाही. मात्र, राज्य मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे की, ज्यावेळी राज्यपालांकडे पाठवलेली १२ नावे जाहीर होतील त्यादिवशी किंवा त्याच्या दुसर्‍या दिवशी विदर्भ आणि मराठवाडा विकास महामंडळ आम्ही स्थापन करणार आहोत, असे म्हणत अजित पवार यांनी विरोधकांना कोंडीत पकडले.

अजित पवारांच्या या विधानावर माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कडाडून विरोध केला. फडणवीस म्हणाले की, दादांच्या पोटातले ओठावर आले आहे. हा विदर्भ- मराठवाड्यातील जनतेला ओलीस ठेवण्याचा प्रयत्न आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली. ते म्हणाले की, असे राजकारण सरकार करणार असेल तर आम्हाला देखील बारा नावे कशी मंजूर होतात ते पहावे लागेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -