घरमुंबई'भाजप वगळता महाराष्ट्रातील सर्व पक्षांना एकत्र आणण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न'

‘भाजप वगळता महाराष्ट्रातील सर्व पक्षांना एकत्र आणण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न’

Subscribe

मुंबई : महाविकास आघाडीचे प्रमुख नेते, महाराष्ट्रातील इतर पक्ष आणि आमचे आघाडीचे घटक पक्ष एकत्र बसून हळूहळू लोकसभेच्या आणि विधानसभेच्या जागांच्या वाटपात बैठक बोलावून चर्चा करणार आहोत. या बैठकीतून अधिक चांगला समन्वय महाराष्ट्रातल्या जनतेपुढे ठेवून एक ठाम पर्याय महाराष्ट्रातल्या जनतेला देण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी करणार असल्याचा निर्णय आजच्या बैठकीत झाल्याचे राष्ट्रवादी काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयाचा सत्तासंघर्षावरील निकाल आणि कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेले घवघवीत यश यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक येथील निवासस्थानी झाली. या बैठकीनंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली.

- Advertisement -

जयंत पाटील म्हणाले की, कर्नाटकमध्ये नुकत्याच ज्या निवडणूका झाल्या त्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा प्रचंड मोठा पराभव झाला आहे. आज महाविकास आघाडीची शरद पवार यांच्या सिल्वर ओकवर पार पडलेल्या बैठकीत कर्नाटक निवडणूकांचा आढावा घेण्यात आला. या निवडणुकीत फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार, वेगवेगळ्या एजन्सीचा गैरवापर आणि स्थानिकदृष्टा जनतेला आलेले त्या सरकारच्या अनुभवावर चर्चा करण्यात आली. महाविकास आघाडी म्हणून नुकत्याच झालेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचाही तिन्ही पक्षाच्या प्रमुखांनी बसून साधतबाधत चर्चा आजच्या बैठकीत झाली. त्याबाबतीत पुढे कोणकोणत्या गोष्टी करता येतील याची चर्चा करण्यात आली. अध्यक्षांना आता जबाबदारी सर्वोच्च न्यायलयाने दिली आहे. या सर्वांचा आढावा घेण्यात आला, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली.

महाराष्ट्रातली महाविकास आघाडी एकसंघपणाने सध्या उन्हाळा प्रचंड प्रमाणात असल्यामुळे महाविकास आघाडीच्या बैठका थोड्याशा प्रलंबित ठेवलेल्या आहेत. थोडासा उन्हाळा कमी झाल्यानंतर जुन महिन्यात पाऊसमान बघून आम्ही पुढच्या सभादेखील सुरू करणार आहे. जर पाऊसमान वाढलं तर मग काही ठिकाणी इनडोअर सभा घ्यायला लागतील. पण पाऊसमान आणि उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेऊन स्थगित केलेली वज्रमूठ सभा थोड्या दिवसांनी पुन्हा सुरू करण्याचा आम्ही विचार करत आहोत, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली.

- Advertisement -

भविष्यात येणाऱ्या लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकांसाठी तिन्ही पक्षाचे प्रमुख एकत्रित बसून हळूहळू लोकसभेच्या आणि विधानसभेच्या जागांच्या वाटपाबाबत चर्चा करणार आहोत. तिन्ही पक्षासोब महाराष्ट्रातील काही इतर पक्ष आणि आमचे आघाडीचे घटक पक्ष या बैठकीत सहभागी होतील. एकत्रितपणाने महाविकास आघाडीचा अधिक चांगला समन्वय महाराष्ट्रातल्या जनतेपुढे ठेवून एक ठाम पर्याय महाराष्ट्रातल्या जनतेला सक्षमपणाने देण्याचा प्रयत्नाच्या निर्णयावर या बैठकीत उपस्थित असलेल्या सर्व नेत्यांचे एकमत झाले आहे. त्यामुळे मला खात्री आहे की, महाविकास आघाडी कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातदेखील महाराष्ट्रातल्या जनतेच्या विश्वासास पात्र ठरून अधिक मोठ्या संख्येने ताकदीने पुढच्या काळात काम करेल, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -