घरमनोरंजनSushant Sucide Case : आता महेश भट्ट यांची चौकशी होणार; गृहमंत्र्यांचे आदेश

Sushant Sucide Case : आता महेश भट्ट यांची चौकशी होणार; गृहमंत्र्यांचे आदेश

Subscribe

बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येप्रकरणी आतापर्यंत ३७ जणांचे जबाब पोलिसांनी नोंदवले आहेत. आज किंवा उद्या दिग्दर्शक – निर्माते महेश भट्ट यांचीही चौकशी होईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले आहे. तसेच अभिनेत्री कंगना रनौत हिला समन्स पाठवण्यात आले असून दिग्दर्शक – निर्माते करण जोहर यांच्या मॅनेजरला संपर्क साधला असून गरज पडल्यास करण जोहर यांनाही चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते, असेही अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. सुशांत सिंह राजपूत यांनी १४ जून रोजी त्याच्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली होती. तणावाखाली असल्याने नैराश्यातून त्याने हे कृत्य केल्याचे सांगितले जात होते. दरम्यान, बॉलीवूडमधील घराणेशाहीला बळी पडून सुशांतने हे पाऊल उचलले असे काही सेलिब्रिटींनी उघडपणे म्हटले आहे. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी सखोल चौकशी करण्यास सुरूवात केली.

- Advertisement -

या प्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी ४० हून अधिक लोकांची चौकशी करून त्यांचा जबाब नोंदवून घेतला आहे. त्यामध्ये सुशांतचा स्वयंपाकी निरज सिंग, घरगडी केशव बच्चानार, मॅनेजर दिपेश सावंत, क्रिएटिव्ह मॅनेजर सिद्धार्थ राममूर्ती पिठानी, बहिण नितू सिंग, मितू सिंग, वडिल के. के. सिंग, अभिनेता महेश शेट्टी, कास्टिंग दिग्दर्शक मुकेश छाब्रा, व्यावसायिक मॅनेजर श्रृती मोदी, पीआर मॅनेजर अंकिता तेहलानी, अभिनेत्री रिया चक्रवर्ती, सिनेदिग्दर्शक संजय लिला भन्साली, यशराज फिल्मचे अध्यक्ष आणि निर्माता आदित्य चौपडा, तीन पत्रकार, तीन मनोचिकित्सकासह एका मानसशास्त्रज्ञाचा समावेश आहे. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सध्या अंतिम टप्प्यात असून त्याचा त्याचा अहवाल वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांसह गृहविभागाला सादर केला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

हेही वाचा –

मालमत्ता कराची देयके अद्यापही पाठवली नाहीत; पालिकेच्या उत्पन्नात घट होण्याची शक्यता

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -