Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर मुंबई माहिम समुद्र किनाऱ्यालगतच्या झोपड्यांवरही हातोडा; महापालिकेची कारवाई

माहिम समुद्र किनाऱ्यालगतच्या झोपड्यांवरही हातोडा; महापालिकेची कारवाई

Subscribe

मुंबईः माहिम समुद्रकिनारी असलेल्या सुमारे ४० ते ५० झोपड्यांवर महापालिकेने कारवाई केली. येथील मजारजवळ असलेले अनधिकृत बांधकामही पालिकेने पाडले.

मनसेचे नेते राज ठाकरे यांनी बुधवारी पार पडलेल्या गुढीपाडवा मेळाव्यात, माहिम येथील समुद्रकिनाऱ्यावरील मजारीच्या बांधकामावर कारवाई करण्याबाबत इशारा दिला होता. त्याची राज्य शासनाने गंभीर दखल घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय यांनी महापालिकेच्या पथकाच्या साहाय्याने सदर वादग्रस्त अनधिकृत बांधकामावर गुरुवारी कारवाई करून ते हटविले.

- Advertisement -

राज ठाकरे यांनी, येत्या एका महिन्यात माहिम समुद्र किनाऱ्यावर उभारलेली अनधिकृत मजार व अनधिकृत बांधकाम करण्यात आले असून ते न हटविल्यास त्याच्या बाजूला गणपतीचे भव्य मंदिर उभारण्यात येईल, असा निर्वाणीचा इशारा शासनाला दिला होता. त्याची गंभीर दखल घेऊन शासनाने जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत व महापालिका यंत्रणेच्या मदतीने गुरुवारी सदर वादग्रस्त मजारीच्या ठिकाणी निर्माण अनधिकृत बांधकामांवर, ४० – ५० अनधिकृत झोपड्यांवर सकाळी व संध्याकाळी अशी दोन टप्प्यात कारवाई केली.

या कारवाईनंतर मनसेच्या वतीने सेनाभवन समोर एक होर्डिंग लावण्यात आली आहे. मनसे इम्पॅक्ट, अवघ्या १२ तासात मुंबईतील माहिम व सांगली येथील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईप्रसंगी, काहीसे तणावाचे वातावरण होते. कोणतीही अप्रिय घटना घडून कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
वास्तविक, पालिकेने गुरुवारी सकाळच्या सत्रात अनधिकृत झोपड्या व मजारीच्या ठिकाणी तोडक कारवाई केली. मात्र समुद्राला भरती लागल्याने पालिकेची काही अवधीसाठी कारवाई थांबविण्यात आली होती. मात्र नंतर समुद्र भरती ओसरल्याने पालिकेने संध्याकाळी पुन्हा एकद सदर मजारीच्या ठिकाणी येऊन मजारीच्या ठिकाणी असलेल्या अनधिकृत बांधकामावर कारवाई केली.
मुंबई महापालिकेच्या ‘परिमंडळ २’ चे उप आयुक्त रमाकांत बिरादार यांच्या व जी/उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत लक्ष्मण सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -